Farmer success story : अनेक शेतकरी आपल्या कौशल्याच्या व कष्टाच्या जोरावर नवनवीन उपक्रम करून आपले नाव लौकिक करत आहेत. तरुण शेतकरी वर्ग शेती सोबत जोडला जाऊन अनेक संकटावर मात करत आपले भविष्य चांगले करण्यास यशस्वी ठरत आहे. अशाच एका तरुण शेतकऱ्यांची कहाणी आज आपण पाहणार आहोत. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वीस गुंठे पेरूची लागवड करून दोन वर्षांमध्ये नऊ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. तर पुढील वर्षी हा शेतकरी 15 लाखावर याच पेरूच्या माध्यमातून उत्पन्न घेण्याची तयारी दर्शवत आहे.

विक्रम सपकाळ याची Farmer success story
पेरूची ही यशस्वी कहाणी बांबोडे गावचा तरुण शेतकरी विक्रम सपकाळ याची आहे. त्याच्या काळ्या मातीच्या वीस गुंठे जमिनीमध्ये सात ट्रेलर शेणखत टाकून अंतराप्रमाणे खड्डे करून घेतले. या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये व्ही एन आर जातीचे पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला. 2022 मधील जानेवारी महिन्यात या पेरूची लागवड पूर्ण केली. वीस गुंठा मध्ये त्याने 400 रोपांची लागवड केली. साधारणपणे एक आरोपाला दीडशे रुपये एवढा दर त्याने दिला. ही लागवड करण्यासाठी दहा बाय सहा यानंतर त्यांनी निवडले. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून ठिबक जोडण्याचा उपक्रम त्याने हाती घेतला. आवश्यक असणारे खते सोडण्यासाठी देखील त्याने ठिबकचाच उपयोग केला.Farmer success story
झाडांची जोमदार वाढ झाल्यानंतर त्याने दहा महिने पूर्ण झाल्यानंतर झाडांची छाटणी पूर्ण करून घेतली. छाटणी केल्यानंतर पेरू पीक धरले. त्यानंतर पुढील सात महिन्यानंतर पीक तोडणीस उपलब्ध झाले. पहिल्याच तोडणी दरम्यान शेतकऱ्याला पाच टन पेरू मिळाला. हमाल त्याने मुंबईच्या मार्केटला पाठवला ज्या ठिकाणी त्याला 65 रुपये हा दर निश्चित झाला. त्यातून त्या शेतकऱ्याला सरासरी तीन लाख रुपये एवढा आर्थिक लाभ मिळाला.
त्यानंतर परत त्या शेतकऱ्याने झाडांची छाटणी पूर्ण करून घेतली. आणि परत पेरूचे पीक धरले. यापुढील सात महिन्यानंतर शेतकऱ्याला एकूण नऊ टन पेरू मिळाला. या पेरूला मैसूर येथील मार्केटला पाठवण्यात आले. या पेरूला शेतकऱ्याला ७२ रुपये प्रति किलो या प्रमाणात दर मिळाला. त्यानुसार शेतकऱ्यांचे एकूण सहा लाख रुपये उत्पन्न झाले.
असे मिळून शेतकऱ्यांना दोन पिकांमध्येच नऊ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. हा शेतकरी तिसरा पिकादरम्यान या पेरूच्या पिकातून 15 टना पेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या शेतकऱ्याने उन्हापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाला क्रॉप कव्हर देखील वापरले आहे. याच्या माध्यमातून पिकांचे ऊनापासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होण्यास मदत मिळाली. त्यासोबतच पेरूला पिशवी घातल्यामुळे पेरूचे देखील चांगल्या प्रकारे संरक्षण झाले.Farmer success story
या तरुणाने जे शेतकरी शेत्र कमी आहे किंवा शेती परवडत नाही अशा विचार श्रेणीतील शेतकऱ्यांना एक चांगले उदाहरण सिद्ध करून दाखवले आहे. शेतीच्या माध्यमातून देखील चांगले उत्पन्न मिळवता येते हे या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. शेतीचे योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा वापर कष्ट आणि बाजारभावाचा अनुभव या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतल्यानंतर शेती नक्कीच शेतकऱ्यांना फायदा देत आहे. Farmer success story