Five Brasses of sand free Gharkul Houses खुशखबर! घरकुल लाभार्थ्यासाठी 5 ब्रास वाळू मोफत, तर इतरांना 1300 रुपये दराने 10 ब्रास वाळू ; या वेबसाईटवर करा नोंदणी! पहा सविस्तर….

Five Brasses of sand free Gharkul Houses : घरकुल लाभार्थ्यांना राज्य सरकारने खुशखबर दिले आहे. घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. या निर्णयाची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच इतरांना पण बांधकाम करण्यासाठी वाळू दिले जाणार आहे . आज आपण या लेखामध्ये मोफत वाळूसाठी नोंदणी कोठे करायची कसा लाभ घ्यायचा याबद्दल माहिती पाहूया.

Five Brasses of sand free Gharkul Houses

या मागचा उद्देश

हा निर्णय घेण्यामागचा सरकारचा उद्देश म्हणजे यातून वाळूचा अवैध उपसा, वाळू चोरी आणि यातून होणारे गुन्हे थांबतील यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. Five Brasses of sand free Gharkul Houses

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : पोस्ट ऑफिसची ही योजना होणार बंद ! आजच खाते उघडा ,31 मार्च शेवटची संधी…

इतरांना पण 10 ब्रास वाळू मिळणार

महसूल विभागाच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना (Five Brasses of sand free Gharkul Houses) प्रत्येकी 5 ब्रास तर इतर नागरिकांना कामासाठी 1300 रुपये ब्रास प्रमाणे महिन्यातून एकदा 10 ब्रास दिली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वाळू चोरी आणि त्यातून होणारे गुन्हे थांबतील, अशी आशा आहे.

या जिल्ह्यातील पावणेदोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे

सध्या जिल्ह्यातील खानापूर, कुडल, देवी कवठे (ता. अक्कलकोट) , मिरी – ताडोर ( मोहोळ – मंगळवेढा ), बाळगी, भंडारकवठे ,लवंगी ( ता. दक्षिण सोलापूर) ,आलेगाव खु.,माळेगाव,गारा अकोले( ता . माढा) ,आणि पंढरपूर तालुक्यातील आव्हे व नांदोरे या ठिकाणी सुमारे पावणे दोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहे . परंतु शासनाचे वाळू धोरण अजून अंतिम न झाल्याने त्या ठोक्याची लिलाव होऊ शकलेले नाहीत .

घरकुल लाभार्थ्यांना आणि अन्य नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार

पावणेदोन लाख ब्रास वाळू उपलब्ध आहेत पण शासनाचे धोरण अजून अंतिम न झाल्यामुळे त्या ठोक्याची लिलाव होऊ शकले नाही त्यामुळे जिल्ह्यातील सरासरी 60 हजार घरकुल लाभार्थ्यांना (Five Brasses of sand free Gharkul Houses) शासनाचे वाळू धोरण अंतिम होण्याची वाट पहावी लागणार आहे.तर तसेच, इतर बांधकाम धारकांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे .

ऑनलाइन नोंदणी करून वाळूची मागणी

तुर्तास , बठाण ( ता. मंगळवेढा ) या ठिकाणची वाळू डोक्यावर उपलब्ध आहे . या जिल्ह्यातील नागरिक ऑनलाइन नोंदणी करून वाळूची मागणी करू शकतात .मागणी करणाऱ्यांना वाळूच्या उपलब्धतेनुसार वाळू मिळणार आहे .Five Brasses of sand free Gharkul Houses

या वाळू ठेक्याचा निर्णय बाकी

  • तालुका वाळू ठेका उपलब्ध वाळू
  • अक्कलकोट कुडल 15,901 ब्रास वाळू
  • अक्कलकोट खानापूर 17,244 ब्रास वाळू
  • अक्कलकोट देवी कवठे 13,251 ब्रास वाळू
  • मोदोळ -मंगळवेढा मिरी-ताडोर 15,710 .ब्रास वाळू
  • दक्षिण सोलापूर बाळगी 11 हजार 247 ब्रास
  • दक्षिण सोलापूर भंडारकवठे 14,841 ब्रास
  • दक्षिण सोलापूर लवंगी 8,109 ब्रास
  • माढा माळेगाव 5,747 ब्रास
  • माढा आलेगाव खु. 17,070 ब्रास वाळू
  • माढा गार अकोले 16,696 ब्रास वाळू
  • माढा टाकळे टे . 16,784 ब्रास वाळू
  • पंढरपूर नांदोरे 11 ,873 ब्रास वाळू
  • पंढरपूर आव्हे 13,387 ब्रास वाळू
  • एकूण —– 1,77,860 ब्रास वाळू उपलब्ध आहे .

वाळूची किंमत किती?

तर जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना 5 ब्रास बाळू मोफत (Five Brasses of sand free Gharkul Houses) मिळणार आहे ,आणि इतर नागरिकांना महिन्यातून एकद 10 ब्रास वाळूसवलतीच्या दरात मिळणार आहे . वाळू ठोक्याची प्रतिब्रास किंमत ही 137 रुपये , 600 रुपये रॉयल्टी , 10 टक्के डीएम (जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी),सॉफ्टवेअर कंपनीचे चार्जेस,असे मिळून साधारणता:साडेबाराशे ते तेराशे रुपये पर्यंत प्रतिब्रास वाळू मिळणार आहे .

वाळू साठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची

वाळूची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शासनाच्या महाखनिज ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे . त्यासाठी तुमच्याकडे मिळकत उतारा, वाळू मागणी करणार्‍या व्यक्तीचे आधार कार्ड, बांधकामाचे लोकेशन निवडून प्राथमिक नोंदणी करावी लागेल आणि वाळूचा स्टॉक उपलब्ध असल्यानंतर वाळू मागणीची स्वातंत्र्य नोंदणी करावी लागणार आहे .Five Brasses of sand free Gharkul Houses

Leave a comment