Fruit Crop Insurance: पिक विमा योजनेचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत

Fruit Crop Insurance : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना सन 2024 – 25 आणि 2025 – 26 या दोन वर्षासाठी राबवली जात आहे. फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केलेले आहे . या आंबिया बहरामध्ये आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आणि संत्रा अशा सहा फळविकांचा समावेश करण्यात आलेला आहे.


या योजनेला शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे ही मान्यता 12 जून 2024 रोजी देण्यात आलेली आहे. फळ पिकांचे नुकसान हे अवकाळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, जास्त प्रमाणात पाऊस, वेगाचा वारा, गारपीट यासारख्या वातावरणात बदल झाल्यामुळे फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. शेतकऱ्यांना झालेल्या या फळपिकांच्या नुकसान भरपाई साठी विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्यक देणे व पिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्टे आहेत. यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधून Fruit Crop Insurance योजनेचा लाभ घ्यावा, असे श्री. ढगे. यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : राज्यातील होमगार्डच्या मानधनात दुप्पट वाढ, आता प्रतिदिन मिळणार1083 रुपये

Fruit Crop Insurance ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • संत्रा पिकासाठी अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
  • केळी या पिकासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • मोसंबी या पिकासाठी अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • या पिकासाठी अंतिम तारीख 14 जानेवारी 2025 आहे.
  • द्राक्ष या पिकासाठी अंतिम तारीख 15 ऑक्टोंबर 2024 आहे.
  • आंबा या पिकासाठी अंतिम तारीख 31 डिसेंबर २०२४ आहे.

Fruit Crop Insurance योजनेचे वैशिष्ट्ये

  • या योजनेमध्ये सहभागी घेण्यासाठी अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाड्याने, पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी सहभाग घेण्यासाठी पात्र आहेत.
  • सन 2024 – 25 फळपिक विमा योजनेअंतर्गत कर्जदार तसेच बिगर कर्जदार हे सर्व शेतकरी फळपिक विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • फळ पिक विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार केंद्र शासनाने त्याचा विमा हप्ता 30 टक्के पर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्क्यावरील विमा हप्ता हा राज्य शासन किंवा शेतकऱ्यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
  • पिक विमा योजनेअंतर्गत 30 ते 35 टक्क्यापर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारलेला असून 35 टक्के वरील विमा हप्ता हाराज्य शासन व शेतकऱ्यांना 50 – टक्के प्रमाणे भरावा लागेल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळ पिक विमा योजनेसाठी जमीन भूधारणेच्या मर्यादित एका शेतकऱ्याला अधिसूचित फळ पिक विमा साठी कमीत कमी 0.20 हेक्टर णि जास्तीत जास्त चार हेक्‍टर क्षेत्र मर्यादित पर्यंत विमा नोंदणी करता येऊ शकेल.
  • या योजनेअंतर्गत एका फळ पिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहरापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा योजनेसाठी अर्ज करता येईल. उदाहरण (संत्रा, मोसंबी किंवा डाळिंब)
  • या योजनेअंतर्गत फक्त फळबागाचे विमा संरक्षण कवच लागू राहणार आहे
  • Fruit Crop Insurance फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई – पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. तसेच झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असणे गरजेचे आहे.
  • बँकेकडून अधिसूचित फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असणारे शेतकरी कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी या सर्वांनी वेळेत प्रस्ताव सादर करून या योजनेचा सहभाग घ्यायचा आहे.

Leave a comment