gharkul beneficiary free electricity शासनाच्या घरकुल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जा च्या मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील प्रेसक्लबमध्ये झालेल्या ‘मिट दे प्रेस’ कार्यक्रमात त्यांनी या योजनेबाबतचे नियोजनही सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अफलातून योजनेबाबत जाणून घेऊया.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० लाख घरे
gharkul beneficiary free electricity केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चव्हाण यांनी नुकताच महाराष्ट्राला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २० लाख घरे मंजूर केली आहेत. देशाच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमय्या आवास योजनासह इतरही काही योजनेचे लाभ दिले जात आहे . या योजनेच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज मिळेल. यामुळे घरकुलधारकांना वीजबिलाचा त्रास होणार नाही. सरकारकडून या योजनेवर ठोस काम सुरू असून नागरिकांच्या उर्जेच्या गरजा कमी दरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
ऊर्जा क्षेत्रासाठी २५ वर्षांचा कृती आराखडा
राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी शासनाने ऊर्जा क्षेत्रासाठी २५ वर्षांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सौर ऊर्जेसह विविध ऊर्जा स्रोतांचा समावेश आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेवर गतीने काम सुरू असून त्यामुळे दोन ते तीन वर्षांत राज्यातील उद्योगांसह इतर संवर्गातील ग्राहकांना कमी दरात वीज मिळेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी संगितली .
हे वाचा: प्रधानमंत्री आवास योजना : गरीब कुटुंबांसाठी घराचे स्वप्न साकार
gharkul beneficiary free electricity पंतप्रधान आवास योजनेची वैशिष्ट्ये
पंतप्रधान आवास योजना ही २५ जून २०१५ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयाने सुरू करण्यात आली आहे . ही योजना सुरुवातीला २०२२ पर्यंत मर्यादित होती, परंतु नंतर तिची मुदत वाढवण्यात आली आहे. नागरी व ग्रामीण असे दोन भाग या योजनेत समाविष्ट आहेत. या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येतो.
पात्रतेचे निकष
gharkul beneficiary free electricity पंतप्रधान आवास योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अर्जदार भारतीय नागरिक असणे अवशक आहे .
- जर नागरिक सरकारी नोकरी करत असेल तर या योजनेचा अर्ज करता येणार नाही.
- करदाते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे.
- अर्जदाराच्या नावावर कोणतेही घर नसावे.
- अर्जदाराने पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
निष्कर्ष
सरकारच्या या योजनांमुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून ऊर्जा बचतीसाठी नवा मार्ग मोकळा होईल. तसेच, सौर ऊर्जेचा वापर वाढल्याने पर्यावरणालाही फायदा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या योजनांनी शाश्वत विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे.