girl scheme Maharashtra: मुलींच्या भविष्यासाठी,सरकारच्या खास योजना, पहा सविस्तर.

girl scheme Maharashtra सरकार मुलींच्या शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, आणि सुरक्षित भविष्याचा विचार करून नेहमीच नवनवीन योजना राबवत आसते . मुलींचा विकास हा देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याने सरकारच्या या योजनांचा उद्देश त्यांच्या आयुष्याला आर्थिक स्थैर्य देणे हा असतो . त्यामुळे सरकार हे नेहमीच मुलीच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. चला,तर आज आपण या लेखामध्ये मुलींच्या भविष्यासाठी काही खास योजना पाहणार आहोत.ज्यामुळे मुलींच्या पालकांची चिंता मिटणार आहे.

girl scheme Maharashtra

प्रत्येक मुलीच्या आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलीचे लग्न चांगले व्हावे, तिच्या शिक्षणामध्ये आपण कुठे कमी पडू नये असे प्रत्येक मुलीच्या आई-वडिलांचे इच्छा असते. तर आज आपण सरकारच्या काही खास योजना पाहणार आहोत ज्या मुलींच्या भविष्यासाठी उपयोगी पडू शकतात. ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू ठेवू शकता तसेच सरकारकडून पण तुम्हाला अनुदान दिले जाते. या योजना सरकारच्या असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही.तुम्हाला यातील पैसे अगदी सुरक्षिततेसह दिले जातील .

girl scheme Maharashtra लेक लाडकी योजना

महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी 2023-24 साली सुरू केलेली लेक लाडकी योजना ही विशेष आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या 18 व्या वर्षापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. टप्प्याटप्प्याने दिल्या जाणाऱ्या या मदतीत एकूण 75,000 रुपये पालकांच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावं लागू नये, असा सरकारचा हेतू आहे. लेक लाडकी योजना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

माझी कन्या भाग्यश्री योजना

girl scheme Maharashtra माझी कन्या भाग्यश्री ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे . दोन मुलींनंतर नसबंदी करणाऱ्या पालकांना या योजनेतून प्रोत्साहन दिले जाते. अशा कुटुंबांच्या मुलींसाठी सरकार 50,000 रुपयांची मदत करते. तुम्ही देखील दोन मुलींचे पालक असाल आणि कुटुंब नियोजनाचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्या दोन्ही मुलींना सरकारकडून 25 – 25 हजार रुपये मिळतील. ही रक्कम दोन्ही मुलींसाठी समान प्रमाणात 25,000 रुपयांप्रमाणे दिली जाते. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर पूर्ण रक्कम मुलीच्या नावाने मिळते .पण या पैशावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही .

बालिका समृद्ध योजना

girl scheme Maharashtra बालिका समृद्ध योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी फायदेशीर आहे. मुलींच्या जन्मानंतर तिच्या आईला 500 रुपयांची सबसिडी दिली जाते.तसेच ,याशिवाय शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरवर्षी 300 ते 1,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे मुलींच्या शिक्षणाला चालना मिळते आणि पालकांना आर्थिक मदत होते. बालिका समृद्धी योजना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेच्या लाभ आत्तापर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे. सुकन्या समृद्धी ही योजना मुलींच्या भविष्यासाठी पालकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणारी योजना आहे . मुलीच्या भविष्यासाठी अनेक पालक या योजनेमध्ये गुंतवणूक करतात. ही योजना 10 वर्षांच्या मुदतीसाठी आहे. यात पालक दरवर्षी कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेंतर्गत उच्च व्याजदरासह सुरक्षित गुंतवणूक दिली जाते. सुकन्या समृद्धी योजना बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

girl scheme Maharashtra पालकांची मुलींच्या भविष्याविषयीची चिंता कमी करण्यासाठी या सर्व योजना उपयुक्त आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या स्वावलंबनासाठी आवश्यक ती आर्थिक सुरक्षा मिळेल. पालकांनी योजनेचा लाभ घेऊन मुलींच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी उचलावी.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment