Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana: ऊसतोड अपघातग्रस्त कामगारांना देण्यात येणार 5 लाखापर्यंत सानुग्रह अनुदान

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana : राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. सानुग्रह अनुदान राबविण्यासाठी गुरुवारी दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांचा अपघात मृत्यू झाला अपंगत्व झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राज्यातील सरकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम झोपडपट्टी व बैल जोडी पण यांना या अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. पण सानुग्रह योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana


सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत राज्यात ऊस तोडणी व वाहतूक करताना होणारे अपघात, सर्वदंश विजेचा शॉक , नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच विविध कारणामुळे होणाऱ्या अपघातात ऊसतोड कामगार किंवा मुकादम यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व होत असतात. अशावेळी संबंधित व्यक्तीच्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होते.

त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत 4 ऑक्टोंबर रोजी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम त्यांचे झोपडपट्टी आणि बैल जोडी यांचा अपघात विमा उतरवण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार राज्य सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध करून या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana योजनेअंतर्गत आर्थिक मदत

  • सानुग्रह योजनेअंतर्गत आग लागून झोपडपट्टी आणि सामग्रीचं नुकसान झाल्यास 10 हजार रुपये मदत दिली जाईल.
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये वारसदारच देण्यात येतील.
  • अपघातात अपंगत्व असल्यास 2 लाख 50 हजार रुपये अपघातग्रस्तांना देण्यात येतील.
  • अपघातात वैद्यकीय खर्च 50 हजार रुपये . दिला जाईल.
  • लहान बैल जोडी मृत्यू वा अपंगतत्वासाठी 75 हजार रुपये दिले जातील.
  • मोठ्या बैल जोडीचा मृत्यू झाल्यास 1 लाख रुपये सानुग्रह अनुदान योजनेतून देण्यात येणार आहे

सानुग्रह योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम झोपडपट्टी व बैल जोडी पण या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana योजनेअंतर्गत या व्यक्तींना आर्थिक मदत मिळणार

सनुग्रह अनुदान ही योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठीच लागू राहणार आहे.

  • या योजनेमध्ये रस्ता रेल्वे अपघात.
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • जंतुनाशके हाताळताना किंवा विविध कारणामुळे विषबाधा
  • विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात.
  • विज पडून मृत्यू
  • उंचावरून पडलेला मृत्यू
  • सर्पदंश
  • विंचूदंश
  • जनावरांचा हल्ला
  • चावामुळे जखमी वा मृत्यू
  • बाळंतपणातील मृत्यू
  • दंगल किंवा अन्य कोणतेही अपघात असेल तर या योजनेतून लाभ दिला जाणार आहे .

हे वाचा : 12 हजार रुपये वर्षाला जमा केल्यावर तुम्हाला मिळणार 17,45,481 रुपये

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana योजनेअंतर्गत या व्यक्तींना आर्थिक मदत दिली जाणार नाही

  • नैसर्गिक मृत्यू झाल्यास
  • योजनेच्या पूर्वीच अपंगत्व झाल्यास
  • आत्महत्येचा प्रयत्न केल्यास
  • आत्महत्या केल्यास
  • जाणीवपूर्वक स्वतला जखमी करून घेतल्यास
  • गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
  • अंमली पदार्थाचे सेवन करून झालेला अपघात
  • भ्रमिष्टपणा
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव
  • बैलगाडा शर्यतीतील अपघात
  • युद्ध वा सैन्यातील नोकरी
  • जवळच्या लाभधारकांकडून खून यासाठी आर्थिक लाभ मिळणार नाही
  • तसेच अन्य विभागाकडून अपघातग्रस्तासाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतअसाल तर मात्र या योजनेला लाभार्थी कुटुंब पात्र राहणार नाही .

Gopinath Munde Sanugraha Anudan Yojana योजनेसाठी कोण पात्र असेल

  • मृत कामगाराची पत्नी/पती
  • मृत कामगाराची अविवाहित मुलगी
  • मृत कामगाराची आई
  • मृत कामगाराचा मुलगा
  • मृत कामगाराचे वडील
  • मृत कामगाराची सून
  • अन्य कायदेशीर वारसदार

Leave a comment