वयोश्री योजनेअंतर्गत नागरिकांना रक्कम जमा होण्यास सुरवात ; पहा कोणाला मिळणार लाभ : CM Vayoshri Yojana Labh 2024

CM Vayoshri Yojana Labh 2024 विधानसभा निवडणुका तोंडावर आले असताना राज्य सरकारने राज्यांमध्ये नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि त्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा झाले होते त्यानंतर राज्यांमधील 65 वर्षे वय तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली आहे या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी कोल्हापूर मधून करण्यात आली आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

CM Vayoshri Yojana Labh 2024

सरकार सध्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना 3000 रुपये देण्यात आले आहेत राज्यांमध्ये आतापर्यंत 17 लाख 23 हजार 30 इतके अर्ज प्राप्त झाले आहे त्यामधील कोल्हापूर जिल्ह्यामधील पात्र असणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत 40 हजार 220 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा करण्यात आले आहेत.

CM Vayoshri Yojana Labh 2024 ज्येष्ठ नागरिकांना या पैशांमधून त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी खरेदी करता याव्यात तसेच मनस्वास्थ्य केंद्र इत्यादी शिबिरामध्ये सहभागी होता यावे असेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे कोल्हापूर मधून मुख्यमंत्र्यांनी वयोश्री योजनेची सुरुवात केली आहे आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील होणार आहे.

CM Vayoshri Yojana Labh 2024 काय आहे ?

ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग दुर्बल ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक सहाय्यता साठी उपकरणे आणण्यासाठी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहे ?

CM Vayoshri Yojana Labh 2024 माध्यमातून ज्या नागरिकांची 31 डिसेंबर 2023 पर्यंत 65 वर्षे पूर्ण झाली आहेत ते नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत ज्या व्यक्तीचे वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे आधार कार्ड नसल्यास ओळख पटवण्यासाठी स्वतंत्र ओळख कागदपत्रे देखील ग्राह्य धरले जाणार आहेत याच प्रमाणे ज्या व्यक्तीचे एक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन लाख रुपयां पेक्षा कमी आहे असे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असणार आहेत.

हे वाचा: मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून आलेले 3000 रुपये जमा झाल्यानंतर त्यांनी खरेदी केलेले उपकरण दिले जाते मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे प्रमाणपत्र हे 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त तसेच समाज कल्याण विभागाकडे द्यायचे आहे.

या योजनेसाठी कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वयंघोषणापत्र

CM Vayoshri Yojana Labh 2024 अर्ज कसा करावा ?

CM Vayoshri Yojana Labh 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी संबंधित सेतू सुविधा कार्यालय किंवा ऑनलाइन पद्धतीने सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Leave a comment

Close Visit Batmya360