हार्दिक पांड्या आणि नताशा यांची घटस्फोटाची अधिकृत घोषणा.
भारतीय क्रिकेट टीम मधील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या(Hardik Pandya) च्या घटस्फोटाबद्दल मागील बऱ्याच दिवसापासून संपूर्ण जग भर चर्चा सुरू होती. आयपीएल चे सामने संपल्या पासून या चर्चेला खूपच उधाण आले. परंतु आज पर्यंत भारतीय क्रिकेट टीम चा अष्ट पैलू हार्दिक पांड्या (Hardik pandya)व त्याची पत्नी नताशा (Natasha) यांनी या बाबत खुलासा केला नव्हता.
इंस्टाग्राम वरुण घटस्फोटाचा केला खुलासा
दिनांक 19 जुलै रोजी भारतीय क्रिकेट टीम चा अष्टपैलू हार्दिक पांड्या(Hardik Pandya) व त्याची पत्नी नताशा (Natasha) यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट करत आम्ही घटस्फोट घेत असल्याची माहिती शेयर केली आहे. विशेष म्हणजे अश्या पद्धतीची पोस्ट दोघाणी म्हणजे हार्दिक पांड्या व नताशा यांनी आपल्या आपल्या अकाऊंट वरुण या बाबत पोस्ट करत खुलासा केला आहे.
घटस्फोटा नंतर मुलगा अगस्त कोणाकडे
हार्दिक आणि नताशा यांचा 1 जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा झाला. त्यानंतर 31 मे 2020 मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव अगस्त ठेवण्यात आले.
आता पती पत्नी हार्दिक पांड्या आणि नताशा यांची घटस्फोटाची अधिकृत घोषणा करून निर्णय घेतला आहे. मग मुलाचे काय याबाबत पण हार्दिक आणि नताशा यांनी खुलासा केला आहे. हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त बद्दल बोलतांना आम्हाला अगस्त भेटण हे आमच नसीबच आमचा मुलगा आमच्या जीवनाचा आधार बनून राहील आम्ही दोघे (हार्दिक आणि नताशा ) मिळून मुलाचा सांभाळ करू आणि त्याला जगातील सर्व खुशी देण्याचा प्रयत्न करणार आणि आम्हाला मुलासाठी जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.