Harvester yojana 2024 : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे या देशांमध्ये जास्तीत जास्त नागरिक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. सध्याची तरुण पिढी ही शेती पारंपरिक पद्धतीपेक्षा तंत्रज्ञान पद्धतीने जास्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या तर बेरोजगार तरुणांसाठी शेती हा व्यवसाय करत करतच दुसरा छोटा मोठा व्यवसाय करण्याची जास्त उत्सुकता असते.
शेतीला जोडधंदा म्हणून गाय ,म्हैस पशुपालना सारखे व्यवसाय करत असतात. तसेच अनेक जण हे विविध यंत्रे घेऊन शेतीच्या माध्यमातून चांगले पैसे कमवत असतात. कारण की फक्त शेती करायचे म्हणले की खूप राब राबप्रभावी लागते आणि आजकालच्या तरुण पिढीला कष्ट करायची म्हटले की नको वाटते. आणि त्यांना छोटासा कोणताही व्यवसाय करावा असे वाटते.
जर तुम्ही हार्वेस्टर घेण्यासाठी इच्छुक असाल .आणि तुम्हाला हे हार्वेस्टर चालवून चांगली प्रगती करायची असेल तर सरकार कडून तुम्हाला हे यंत्र खरेदी करण्यासाठी यंत्राच्या किमतीपेक्षा अर्ध्या किमतीपेक्षा जास्तीत जास्त पैसे देण्यात येणार आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहूया.
Harvester yojana 2024 हार्वेस्टर सबसिडी योजना
सरकारकडून या यंत्रासाठी अनुदान हे देशांमध्ये अनेक राज्यांमध्ये सध्या तर भात आणि इतर पिकांची कापणी आणि विक्री केली जात आहे. याला पाठिंबा देण्यासाठी सरकारकडून कृषी यंत्रणावर अनुदान देण्यात येत आहे. या अनुषंगाने, राज्य सरकारकडून धान कापणीसाठी साखळी कापणी यंत्राच्या खरेदीवर शेतकऱ्यांना 55% अनुदान देण्यात येत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, तेरा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी भात शेती पिक घेतलेले आहे, त्या शेतकऱ्यांना ट्रॅक प्रकार भात कापणी यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी त्या व्यक्तींना आमंत्रित केले आहे . ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र खरेदी करायचे आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे .
या यंत्र खरेदी अनुदानासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी ई – कृषी यंत्रसामग्री सबसिडी पोर्टल द्वारे 10 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. दहा नोव्हेंबर पर्यंत अर्ज केल्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी त्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक प्रकार भात कापणी यंत्र अत्यंत कमी दरात मिळेल.
Harvester yojana 2024 कापणी यंत्राचे प्रकार आणि उपलब्ध अनुदान
या यंत्राचा उपयोग भात कापणीसाठी, ट्रॅक प्रकार भात कापणी यंत्रासह वेगवेगळी यंत्रे वापरली जातात. कृषी अभियांत्रिकी विभागाने विशिष्ट अनुदान दरासह ट्रॅक हार्वेस्टर चे वितरण करण्यासाठी जिल्हा निहाय उद्दिष्टे जारी करण्यात आलेले आहेत.
Harvester yojana 2024 या योजनेअंतर्गत लहान आणि अल्पभूधारक शेतकरी 55% अनुदानासाठी पात्र आहे, तर बाकी इतर शेतकऱ्यांना हे यंत्र खरेदीसाठी यंत्राच्या किमतीवर 45% अनुदान मिळते. शेतकऱ्यांना सबसिडी बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध सबसिडी कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून नागरिकांना अचूक अनुदान दर तपासू शकतात.
Harvester yojana 2024 योजनेचा अर्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना
साखळी कापणी यंत्रावरील अनुदानासाठी अर्ज करायचा असेल तर, अर्जदारांनी त्यांच्या अर्जासोबत INR 2 लाख चा डिमांड ड्राफ्ट (DD) सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर हा DD अर्जदाराच्या बँक खात्यातून त्यांच्या जिल्ह्याच्या सहाय्यक कृषी अभियंत्याच्या नावे जारी केला जाणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे आवश्यक ठेवी शिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे वाचा: मोफत रब्बी पीक विमा अर्ज
Harvester yojana 2024 कृषी यंत्र प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे
कृषी यंत्र अनुदान योजनेसाठी खालील दिलेली कागदपत्रे आवश्यक आहेत.
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- जमिनीच्या मालकीची कागदपत्रे
- बँक पासबुक
- अर्जदार विकीचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- आधार कार्ड
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
या सबसिडी सह चेन हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी ई – कृषी यंत्र अनुदान पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
या पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांनी आधीच नोंदणी केलेली आहे असे शेतकरी आधार OTP सह लॉग इन करू शकतात,तर नवीन अर्ज करणाऱ्यांसाठीअर्ज करायच्या अगोदर नोंदणी करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे खूप कठीण जात आहे अशा शेतकऱ्यांनी अर्ज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या जवळच्या एमपी ऑनलाइन किंवा सीएससी केंद्राला भेट देऊशकतात.आणि तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास किंवा मदत हवी असल्यासशेतकऱ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात.
Harvester yojana 2024 या यंत्र अनुदान कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी यंत्रे परवडणारी बनवणे, तसेच या योजनेचे असे उद्देश आहे की शेतकऱ्यांना त्यांची पिके लवकरात लवकर कापणी करण्यास आणि त्याची उत्पादकता वाढविण्यास मदत करणे हा आहे.
1 thought on “Harvester yojana 2024 : सरकारकडून व्यवसाय करण्यासाठी हार्वेस्टर सबसिडी योजना , अर्ध्यापेक्षा जास्त पैसे मिळणार अनुदानातून”