गाय गोठा अनुदान योजना – महाराष्ट्र सरकारची विशेष मदत gai gotha anudan

gai gotha anudan महाराष्ट्रात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे.या योजनेच्या आधारे शकऱ्यांना गाईचा गोठा बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना गायींच्या सुरक्षित आणि पक्क्या निवाऱ्यासाठी आर्थिक मदत देणे. यामुळे गायींचे आरोग्य सुधारते, दूध उत्पादन वाढते, आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते.

gai gotha anudan योजनेची उद्दिष्टे

राज्यातील कमी क्षेत्र असणारे शेतकरी असो किंवा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी असो , यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती आणि शेतीला छोटासा जोडधंदा म्हणून पशुपालनावर अवलंबून आहेत.पण मात्र, अनेकांकडे जनावरांसाठी पक्का वारा नसल्याने गायींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने गोठा अनुदान योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक गोठे बांधता येतात आणि पशुपालन अधिक चांगल्या प्रकारे करता येते.

हे वाचा: येथे भरा मोफत पीक विमा अर्ज

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

अनुदानाची रक्कम

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जनावरांच्या संख्येनुसार अनुदान दिले जाते:

  • २ ते ६ जनावरे असणाऱ्यांसाठी: ₹७७,१८८ अनुदान
  • ७ ते १२ जनावरे असणाऱ्यांसाठी: ₹१,५४,३७६ अनुदान
  • १३ ते १८ जनावरे असणाऱ्यांसाठी: ₹२,३१,५६४ अनुदान

याशिवाय, शेळी आणि कोंबडी पालनासाठीही अनुदानाची तरतूद आहे, ज्यामुळे इतर पशुपालन व्यवसायाला मदत होते.

gai gotha anudan अर्ज प्रक्रिया

gai gotha anudan गाय गोठा अनुदान योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे. शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही; ते थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते.

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • जनावरांचे टैगिंग असलेला दाखला
  • रहिवाशी दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • जमीन दाखला (७/१२ उतारा व ८ अ उतारा)
  • बँक खात्याचा तपशील
  • ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र
  • मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

गोठ्याचे बांधकाम आणि मापदंड

गोठा बांधताना ठराविक मापदंड पाळणे गरजेचे आहे. उदा., गोठ्याची लांबी ७.७ मीटर आणि रुंदी ३.५ मीटर असावी. यामुळे जनावरांना पुरेशी जागा मिळते, त्यांचे आरोग्य चांगले राहते, आणि दूध उत्पादनात वाढ होते.

पात्रता

गाय गोठा अनुदान योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिलाप्रधान कुटुंब, भूसुधार योजना लाभार्थी, आणि अल्पभूधारक शेतकरी पात्र आहेत.

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

योजनेचे फायदे

या योजनेमुळे शेतकऱ्यांना गायींसाठी पक्के गोठे बांधण्यास मदत होते, ज्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादन वाढते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून जीवनमान सुधारण्यास मदत होते.

Leave a comment