होम लोन वर मिळणार अनुदान, त्यासाठी सरकारच्या या योजनेचा घ्या लाभ ! Home Loan

Home Loan : सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांच्या समोर कर्ज काढण्याचा हा एकमेव पर्याय असतो. मग त्या नागरिकांना आपल्याला कर्ज कोणत्या बँकेकडून दिले जाईल, त्याचा व्याजदर किती असेल याच्या शोधामध्ये असतात. परंतु अनेक वेळा कर्ज मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. तसेच दुसरीकडे बँका सर्वसामान्य नागरिकांना कर्ज देण्यासाठी काहीतरी गहाण टाकायला सांगते. जर तुम्हाला अन्य कारणामुळे कर्ज काढण्याचा विचार असेल तर, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे .

कारण की तुम्ही आता कमी व्याजदराने कर्ज काढू शकतात. चला तर आपण आज या लेखामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0

केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी देशांमध्ये पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 राबवत आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांसाठी एक कोटी घरे तयार केली जाणार आहे. एवढेच नाही तर, विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत देशातील एक कोटी कुटुंबाला 2 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर या अनुदानातून नागरिकांना होम लोन देखील देण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 चे स्वरूप

पंतप्रधान आवास योजना शहरी 2.0 मध्ये देशातील आर्थिक दुर्बल घटक कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट याचा समावेश करण्यात आला आहे .तसेच या योजनेअंतर्गत या गटातील नागरिकांना व्याज अनुदान दिले जाणार आहे. तसेच यामध्ये अशा नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे ज्या नागरिकांचे देशात कुठेही पक्के घर नाही.

हे वाचा: किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख पर्यंतचे कर्ज

काय आहे व्याज Home Loan अनुदान योजना?

Home Loan या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी घेतलेल्या होम लोनवर व्याज अनुदान योजनेच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार आहे. जर या अनुदानामध्ये 35 लाखापर्यंतचे घर असेल, तर 25 लाखापर्यंत होम लोन घेणाऱ्या लाभार्थ्यांना 12 वर्षासाठी 8 लाख रुपये व्याज अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदान लाभार्थ्यांना OTP किंवा स्मार्ट कार्डच्या माध्यमातून खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा ही मिळणार आहे.

तसेच अशा नागरिकांना घर बांधणे पण सोपे होणार आहे. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 35 लाखापर्यंतची घर असेल, तर 25 लाखापर्यंत होम लोन घेणाऱ्या लाभार्थ्यांना 12 वर्षासाठी 8 लाख रुपये व्याज अनुदान देण्यात येणार आहे.

Home Loan

Leave a comment