kapus soyabin anudan राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी, प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा अधिवेशनादरम्यान केली होती. या घोषणे अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पुढील प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये आज पर्यंत 60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात आले आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना हे अनुदान कधी मिळणार याची चिंता लागलेली आहे या माध्यमातून कृषी विभागाने उर्वरित केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम या दिवशी जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळते हे अनुदान.
ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये आपल्या शेतात सोयाबीन व कापूस पिकाचे उत्पन्न घेतले आहे व ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या सातबारावर कापूस आणि सोयाबीन या पिकाची यशस्वीरित्या नोंद केली आहे, याच शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
अनुदान मिळवण्यासाठी KYC बंधनकारक
राज्यातील 96 लाख पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना या अनुदान लाभासाठी kyc करणे बंधनकारक होते. परंतु शासनाकडून यामध्ये 48 लाख शेतकऱ्यांची केवायसी ही पीएम किसन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मार्फत घेण्यात आली. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करणे आवश्यक आहे. kyc केल्यानंतरच या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम वितरित केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही kyc केली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून अनुदानाचा लाभ घ्यावा असे आव्हान देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
kapus soyabin anudan कशी करावी KYC
kapus soyabin anudan kyc करण्यासाठी सर्वप्रथम शासनाने निर्गमित केलेले अधिकृत पोर्टल https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला Disbursement status या पर्यायावर क्लिक करावे लागेल, या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला आधार नंबर मागेल त्या ठिकाणी आपला आधार नंबर भरून गेट ओटीपी या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी त्या ठिकाणी भरून घेतल्या नंतर ओटीपी भरल्यानंतर आपली केवायसी यशस्वीरित्या पूर्ण होते.
हे वाचा : कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले अनुदान कमी
जर आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला या पद्धतीने केवायसी करता येत नाही. त्याकरिता आपल्याला बायोमेट्रिकच्या मदतीने केवायसी करणे आवश्यक असते. बायोमेट्रिक च्या मदतीने केवायसी करण्यासाठी आपण आपल्या जवळील सीएससी सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून आपली kapus soyabin anudan kyc पूर्ण करून घेऊ शकता.
उर्वरित शेतकऱ्यांना कधी मिळेल लाभ
कापूस सोयाबीन अनुदान अंतर्गत आत्तापर्यंत 60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे. परंतु उर्वरित 36 लाख शेतकऱ्यांनी अजून आपली kapus soyabin anudan kyc पूर्ण केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी अजून आपले अनुदान केवायसी फॉर्म आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे भरून दिलेले नाहीत, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात आले नाही परंतु पहिला टप्पा झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी आपले अनुदान केवायसी पूर्ण केली आहे. त्या शेतकऱ्यांना येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी अंतर्गत ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.