cotton soybean anudan राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून 5 हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणात अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या क्षेत्रापेक्षा कमी मिळालेली आहे, ही मिळालेली रक्कम कमी कशामुळे मिळाली याचे कारण शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. हे अनुदान नेमकं कशामुळे कमी मिळालं याचं कारण काय याबद्दलची सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत.
सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार सहमती पत्र व आधार कार्डची झेरॉक्स आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केलेले आहे. कृषी सहाय्यक यांच्याकडून पोर्टलवर शेतकऱ्यांच्या नावासमोर शेतकऱ्याचा आधार नंबर, शेतकऱ्याचे नाव, आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर भरण्यात आला. त्यानंतर ही माहिती शेतकऱ्यांना केवायसी करताना दिसून आली. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी दोन पिकांची नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांना दोन पिकांची माहिती न दर्शवता एकाच पिकाची माहिती दर्शवली आणि त्या शेतकऱ्यांना त्या एकाच पिकाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाले.
cotton soybean anudan या कारणामुळे मिळाले अनुदान कमी
शेतकऱ्यांची कापूस व सोयाबीन या पिकांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांची नोंद केलेली होती. त्या शेतकऱ्यांची नावे दोन्ही यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. परंतु शेतकऱ्यांनी आधार सहमती पत्र भरून देताना एकच सहमती मध्ये पत्र भरून दिल्यामुळे एकाच पिकाच्या समोर शेतकऱ्यांचे आधार तपशील भरण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे एक पीक रिक्त राहिले रिक्त राहिलेल्या पिकाचे/ क्षेत्राचे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.
ज्या शेतकऱ्यांचे एकच पिकाचे अनुदान आले आहे. त्यांचे पोर्टलवर एका पिका समोरील माहिती भरण्यात आलेली नाही, त्यामध्ये तुमचं सोयाबीन किंवा कापूस कोणताही पीक असू शकत. याची खात्री करण्यासाठी आपण आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्याला एकाच पिकाचे अनुदान मिळाले असल्याची आणि ज्या पिकाच्या अनुदान मिळाले नाही याबाबतची माहिती विचारा. त्यांच्याकडून तुमच्या ज्या पिकाच्या अनुदान तुम्हाला मिळाले नाही त्या पिकासमोर तुमचा आधार नंबर तुमचे नाव व तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या जेणेकरून तुम्हाला राहिलेले अनुदान देखील लवकरच मिळून जाईल.
एकाच पिकाचे अनुदान का मिळाले
cotton soybean anudan ज्या शेतकऱ्यांना एकाच पिकाचे अनुदान मिळाले आहे. त्या शेतकऱ्यांचे अनुदान पोर्टल वर कृषि सहायक यांच्या कडून दुसऱ्या पिकाची माहिती समोर शेतकऱ्याचा आधार नंबर भरण्यात आला नाही. आधार नंबर न भरल्या मुळे शेतकऱ्यांना kyc करते वेळी देखील त्या पिकाची माहिती दर्शवली जात नाही व त्या पिकाचे अनुदान देखील वितरित केले जात नाही.
हे वाचा : ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदान
दोन पीकाची माहिती कोठे पहावी.
कृषी सहायक यांनी आपल्या गावानुसार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्या होत्या या याद्यांमध्ये काही शेतकऱ्यांचे दोन्ही पिकांमध्ये नावे समाविष्ट होते. परंतु शेतकऱ्यांना एकाच पिकाचे अनुदान मिळालेले आहे. आता मिळालेल्या अनुदान कोणत्या पिकाचे आहे हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलवर केवायसी माहिती भरल्यानंतर आपल्या समोर जी पावती तयार होऊन येते त्या पावती मध्ये देखील कोणत्या पिकाचे अनुदान आपल्याला मिळाले आहे याची माहिती दर्शवली जाते. यामध्ये जर दोन्ही पिकांची नावे आपल्या दिसल्यास आपल्याला दोन्ही पिकांचे अनुदान मिळाले आहे, परंतु जर एकच पिकाचे नाव या पावती मध्ये दिसत असेल तर दुसऱ्या पिकासमोर आपला आधार नंबर किंवा आपली माहिती भरलेली नाही त्यामुळे आपले अनुदान आपल्याला वितरित करण्यात आलेले नाही. cotton soybean anudan या ठिकाणी आपण आपल्याला कोणत्या पिकाचे अनुदान मिळाले आहे आणि कोणत्या पिकाचे अनुदान मिळणे बाकी आहे हे तपासू शकतात.
अनुदान कमी मिळाले असेल तर काय करावे.
cotton soybean anudan ज्या शेतकऱ्यांना आपल्या अनुदान यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्र पेक्षा कमी अनुदान मिळाले आहे. या शेतकऱ्यांनी आता काय करावे याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांना चिंता झालेली आहे. तर त्या शेतकऱ्यांनी आपल्याला आपल्या राहिलेल्या अनुदानाची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या कृषी सहायक यांच्याकडे आपले आधार सहमती पत्र व आधार कार्डची झेरॉक्स देणे आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याला कोणत्या पिकाचे अनुदान आले नाही याची माहिती देखील कृषी सहाय्यक यांना देणे आवश्यक आहे. ज्यावेळी कृषी सहाय्यक यांच्या लॉगिन मध्ये आपल्या नावा समोर आपला आधार नंबर आपले नाव आणि आपला मोबाईल नंबर समाविष्ट केला जाईल तेव्हाच पोर्टलवर KYC करताना आपल्याला आपले क्षेत्र व आपली रक्कम दर्शवली जाते. आणि केवायसी करताना जी रक्कम आणि जे क्षेत्र दर्शवलं जातं त्या क्षेत्राचा अनुदान शेतकऱ्यांना वितरित केलं जातं. त्यामुळे ज्या पिकाची आपल्याला अनुदान रक्कम मिळाली नाही त्या पिकाची माहिती कृषी सहाय्यक यांच्याकडून भरून घ्यावी जेणेकरून बाकी राहिलेले अनुदान देखील लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
1 thought on “कापूस सोयाबीन अनुदान का मिळाले अनुदान कमी. cotton soybean anudan”