Kapus soybean anudan मागील हंगामात राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली. या अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत दिलेला कालावधी निघून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या अनुदान रकमेबद्दल शंख निर्माण होण्यास सुरू झालेले आहेत. हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे अशी शेतकरी तसेच विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कापूस व सोयाबीन पिकाची नोंद त्यांच्या सातबारावर केली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाकडून ही मदत वितरित केली जाणार आहे. त्याबाबतचा जीआर देखील शासनाने प्रसिद्ध केला आहे यामध्ये 10 सप्टेंबर रोजी ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली होती. परंतु 10 सप्टेंबर ही तारीख निघून जाऊन देखील शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळालेले नाही नेमके अनुदान कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे.
Kapus soybean anudan – Kyc करून देखिल अनुदानाची प्रतिक्षा
राज्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस अनुदानासाठी केवायसी फॉर्म ते सहमति पत्र भरून आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले आहेत. हे जमा केलेले असताना देखील अजून पर्यंत यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले नाही शासनाकडून याबाबत घोषणा करताना सहमती पत्र भरून दिलेल्या शेतकऱ्यांना १० सप्टेंबर नंतर निधी वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. परंतु अजून देखील सहमती पत्र दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदान जमा करण्यात आलेले नाही.
शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे तरी देखील त्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये दिवसेंदिवस विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मनात विविध संभ्रम निर्माण होत आहेत की हे अनुदान मिळणार किंवा नाही याच्या सुद्धा शंका शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
Kapus soybean anudan निधी मंजूर मग वितरण कधी
शासनाने शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली यासाठी निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला परंतु अजून देखील शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आलेली नाही मग मंजूर केलेली रक्कम शेतकऱ्यांना कधी वर्ग होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आता लागलेली आहे.
Kapus soybean anudan शेतकऱ्यांनी kyc कोठे करावी
Kapus soybean anudan पात्र शेतकऱ्यांनी आपल्या अनुदान मागणी अर्ज सोबत सहमतिपत्र भरून दिलेले आहे या सहमती पत्राच्या आधारे आपले कृषी सहाय्यक यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अनुदानाची केवायसी केली जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना सहमती पत्र व आधार कार्डची झेरॉक्स आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यावर कृषी सहाय्यक यांच्याकडून ई पिक पाहणी पोर्टलच्या माध्यमातून निर्माण झालेल्या यादीमध्ये संपूर्ण माहिती भरली जाईल व शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण केली जाईल ही केवायसी पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना अनुदान वितरित होणार आहे. अनुदान कधी वितरित होणार याची अजून तारीख निश्चित सांगण्यात आलेली नाही.
अनुदान kyc कशी केली जाते पहा येथे क्लिक करा
1 thought on “Kapus soybean anudan – कापूस – सोयाबीन अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात शंका”