e pik pahani update ई पिक पाहणी 2024 खरीप हंगाम 2024 करिता ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकाची नोंद सातबारावर करण्याकरता शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ही एक ई पिक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
हे वाचा : ई-पीक पाहणी महत्व न केल्यास होणार मोठे नुकसान
e pik pahani update शेतकऱ्यांनी शेतात घेतलेल्या आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करण्याकरिता तसेच शासकीय अनुदान असेल किंवा पिक विमा असेल या योजने चा लाभ मिळवण्यासाठी व पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करणे आवश्यक आहे. यामध्ये एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात झाली परंतु यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे तसेच अतिवृष्टीच्या परिणामामुळे आपल्या पिकाची ई पीक पाहणी करता आलेली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेले आहे.
या तारखेपर्यंत करता येणार ई पिक पाहणी
e pik pahani updat राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद ई पिक पाहणीच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करता आलेली नाही व या अंतिम तारखेच्या आत ई पिक पाहणी केलेली नाही अश्या शेतकऱ्यांना आता सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 23 सप्टेंबर पर्यंत आपल्या पिकाची नोंद ई पीक पाहणी द्वारे करता येणार आहे.
e pik pahani update शेतकऱ्यांना होणार फायदा
राज्यातील शेतकऱ्यांना ई पिक पाहणी साठी दिलेल्या मुदत वाढीचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याने आपल्या पिकाची नोंद केलेली नाही त्या शेतकऱ्यांना नोंद करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे. जर शेतकऱ्याची या काही कारणास्तव ई पीक पाहणी झाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच त्या शेतकऱ्यांची आपली जमीन पडीक म्हणून सुद्धा नोंद राहू शकते. त्यामुळे शासनाने ई पिक पाहणीसाठी दिलेली ही मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.
2 thoughts on “e pik pahani update : खरीप 2024 साठी ई पिक पाहणी साठी मुदतवाढ”