kharip pik vima: खरीप पिक विम्याचे सरकारकडून 3,265 कोटी मंजूर…! या जिल्ह्याला मिळाला सर्वात जास्त लाभ

kharip pik vima : राज्य सरकारने 2024 च्या खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान खरीप पिक विमा योजनेअंतर्गत तब्बल 3 हजार 265 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.kharip pik vima

kharip pik vima

आतापर्यंत जमा करण्यात आलेली भरपाई

आतापर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत 2 हजार 546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आणि उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.kharip pik vima

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय! 25 हजार कोटी रुपयांची तरतूद..!!

2024 च्या खरीप हंगामात या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मंजूर

यावर्षीच्या खरीप पिक विमा (kharip pik vima) योजनेत एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती राज्यातील शेतकऱ्यांना 2 हजार 552 कोटी 60 लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी 712 कोटी 75 लाख रुपये, असे मिळून एकूण 3 हजार 265 कोटी 36 लाख रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहे.

यामधील सर्वात जास्त रक्कम म्हणजेच 1 हजार 404 कोटी 12 लाख रुपये हे एकट्या लातूर विभागात मंजूर करण्यात आले आहेत. तर यातील 691 कोटी रुपये हे स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून देण्यात आले आहे तर, 712 कोटी 75 लाख हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानी पोटी देण्यात येणार आहेत.आणि लातूर विभागानंतर 629 कोटी 4 लाख अमरावती विभागात शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेला निधी हा अमरावती विभागात स्थानिक आपत्तीतून झालेल्या नुकसानापोटी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.kharip pik vima

प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानापोटी भरपाई

कृषी विभागा कडून आतापर्यंत 2 हजार 546 कोटी 6 लाख रुपयाचे वितरण करण्यात आले आहेत. यामधील 1 हजार 844 कोटी 44 लाख रुपये हे स्थानिक आपत्तीतील झालेल्या नुकसानी पोटी आहेत तर, 701 कोटी 62 लाख रुपयाची नुकसान भरपाई ही हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून झालेल्या नुकसानापोटी देण्यात आली असून आता, उर्वरित 719 कोटी 29 लाख रुपये नुकसान पीक विमा भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे असे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी स्पष्ट केले आहे.kharip pik vima

विभागनिहाय एकूण

  • मंजूर नुकसान भरपाई – 3265.36
  • वितरण -2546.06
  • शिल्लक(कोटीत)- 719.29

Leave a comment

Close VISIT MN CORNERS