krushi pump vendor selection सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.

krushi pump vendor selection राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप वितरित केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शेतकरी हिस्सा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरली आहे. अशा शेतकऱ्यांचे अर्ज मागेल त्याला सौर कृषी पंप यंत्रणे कडून तपासले जातात. अर्ज तपासल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज मंजुरी दिली जाते. अर्ज मंजुरी भेटल्यानंतर शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन साठी पर्याय उपलब्ध करून दिला जातो. वेंडर निवडल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवून दिला जातो.

krushi pump vendor selection

वेंडर निवड म्हणजे काय krushi pump vendor selection

बहुतांश शेतकऱ्यांना वेंडर निवड करणे म्हणजे काय याची कल्पना नाही . वेंडर निवड करणे म्हणजे आपल्याला शासनाने नेमून दिलेल्या कंपन्यापैकी एक कंपनी निवडणे. ज्या कंपनीच्या सहाय्याने आपल्या शेतात सौर कृषी पंप बसवून दिला जातो. यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या कंपन्यांचा समावेश असतो. सौर कृषि पंप अंतर्गत आपण जी कंपनी निवडतो त्याच कंपनीच्या माध्यमातून आपल्याला सर्व साहित्य पुरवले जाते. krushi pump vendor selection

वेंडर कसे निवडावे

krushi pump vendor selection ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांना आता वेंडर निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. वेंडर निवडण्यासाठी शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषि पंप योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायांमध्ये आपला एप्लीकेशन नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर सिलेक्ट वेंडर असा पर्याय दिसून येईल. सिलेक्ट वेंडर पर्यायाची निवड केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील कंपन्यांची नावे आपल्याला दिसून येतील. त्यापैकी आपण आपल्याला हवे असणारी कंपनी निवडू शकता.

वेंडर निवड पर्याय दिसत नसेल तर

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मध्ये अर्ज करून आणि अर्जाचे पेमेंट करून देखील बऱ्याच शेतकऱ्यांना वेंडर निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध झालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या अर्जाची तपासणी करून त्यांना वेंडर निवड करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक जिल्हया साठी वेगवेगळे टार्गेट असतात त्या त्या मुळे आपल्या जिल्ह्यातील टार्गेट संपल्या नंतर देखील आपल्याला वेंडर निवड करण्याचा पर्याय दिसत नाही.

हे वाचा: पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी ?

वेंडर मध्ये कोणती कंपनी निवडावी

शेतकऱ्यांना सौर कृषी पंप निवडताना कंपनी कोणती निवडावी हा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. अशावेळी शेतकऱ्यांनी कोणती कंपनी निवडावी किंवा उपलब्ध असलेल्या कोट्या पैकी कोणती कंपनी चांगली आहे. उपलब्ध कोट्या पैकी ज्या कंपनीचे नाव आपल्याला वेंडर लिस्ट मध्ये दिसत आहेत. त्या कंपनीची आधी इन्स्टॉल केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या शेतकऱ्याकडून कंपनी बद्दलची माहिती घ्यावी. वेंडर निवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा. krushi pump vendor selection

2 thoughts on “krushi pump vendor selection सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.”

Leave a comment

Close Visit Batmya360