रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती. kyc करण्यासाठी मुदतवाढ.

kyc करण्यासाठी मुदतवाढ.  महाराष्ट्र राज्यातील गरीब व गरजू नागरिकांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून अन्नधान्य गहू, तांदूळ, आणि साखर यासारख्या अत्यावश्यक लागणाऱ्या वस्तू नियमित वाटप केल्या जातात. आता यासाठी रेशन धारकांची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. रेशन कार्ड kyc करण्याकरिता 31 ऑक्टोबर 2024 ही अंतिम तारीख देण्यात आली होती; परंतु शासनाने आता नवीन सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेनुसार रेशन कार्डधारकांना केवायसी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

 ई केवायसी नाही केल्यास राशन होइल बंद

अन्न व नागरी पुरवठा विभागाने देशातील सर्वच नागरिकांना आपल्या रेशन कार्ड मधील सदस्यांची केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये ज्या रेशन धारकांची किंवा रेशन धारक कुटुंबातील सदस्यांची केवायसी केली जाणार नाही, त्या रेशन धारक व्यक्तीचे रेशन बंद केले जाणार आहे. यासाठी शासनाने केवायसी ही प्रक्रिया राबवण्याची सूचना दिली. यानुसार जे लाभार्थी केवायसी पूर्ण करणार नाहीत; त्या रेशन धारकांची रेशन कार्ड पूर्णतः बंद केले जाईल. परंतु यामध्ये सर्व नागरिकांना केवायसी करण्याची संधी उपलब्ध व्हावी याकरिता शासनाकडून यामध्ये वारंवार मुदत वाढ देण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

kyc करण्यासाठी मुदतवाढ. कधी पर्यंत देण्यात आली मुदतवाढ

kyc करण्यासाठी मुदतवाढ सर्वच रेशन धारकांची केवायसी करणे बंधनकारक आहे. याकरिता आता मुदत वाढ देण्यात आली आहे. आधी ही मुदत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली होती. परंतु आता नवीन सूचनेनुसार देशातील सर्व रेशन धारक कुटुंबांना तसेच कुटुंबातील सदस्यांना पुढील एक महिन्यापर्यंत kyc करता येणार आहे. म्हणजेच 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत केवायसी करण्यात येणार आहे. त्यानुसार ज्या रेशन धारकांनी आपली केवायसी पूर्ण केली नाही त्यांनी तात्काळ आपली kyc पूर्ण करून घ्यावी.

 KYC कोठे करावी

केवायसी कुठे करावी याबद्दल आपण या आधी सुद्धा बऱ्याच वेळा माहिती घेतली आहे. परंतु परत एकदा केवायसी करण्यासंबंधी आपण सविस्तर माहिती घेत आहोत. आपल्याला जर या रेशन कार्ड मधील सदस्यांची किंवा रेशन धारकांची केवायसी करायची असेल तर आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी जाऊन आपण आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता. त्या ठिकाणी आपल्याला आपले आधार कार्ड आणि स्वतः व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे. यामध्ये बायोमेट्रिकच्या सहाय्याने केवायसी पूर्ण केली जाते त्यामुळे स्वतः व्यक्ती हजर असणे केवायसी करण्यासाठी बंधनकारक आहे.

हे वाचा: शेतकऱ्यांना मिळणार युनिक आयडी कार्ड अशी करा नोंदणी.

 ज्या व्यक्तीचे केवायसी करणे बाकी आहे. अशा नागरिकांनी 30 नोव्हेंबरच्या आत आपली केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. जर आपण केवायसी पूर्ण नाही केली तर आपला रेशन मधील मिळणारा लाभ ज्यामध्ये गहू ,तांदूळ, साखर यासारखे घटक पूर्णपणे बंद केले जातील. त्यामुळे या घटकांचा लाभ घेण्यासाठी आपण तात्काळ आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी.

Leave a comment