falbag pik vima सिंधुदुर्गतील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा परतावा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अंबा,काजू या पिकाचा विमा 21 ऑक्टोंबर या दिवशीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. दरम्यान पीक परताव्यातून वगळलेल्या नो मंडलना देखील परतावा मिळणार आहे. परताव्याच्या रकमेत एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
falbag pik vima आंबा आणि काजू पिकाखालील क्षेत्र
सिंधुदुर्ग मधील हवामानावर आधारित पीक विमा योजनेमध्ये आंबा आणि काजू या पिकांचा समावेश आहे. आंबा पिकाखालील 14 हजार 668 हेक्टर क्षेत्र तर काजू या पिकाखालील 5 हजार 243 हेक्टर क्षेत्र असे मिळून या दोन्ही पिकांसाठी एकूण 19 हजार 911 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले.आंबा आणि काजू पीक परतावा मंजूर
हे वाचा: तीन दिवस राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या राहणार बंद.
पिक विमा योजनेमध्ये या जिल्ह्यातील 42 हजार 190 शेतकऱ्यांनी अर्ज केलेला होता. मागील एक ते दीड महिन्यापासून सातत्याने पिक विमा परतावा मिळावा याकरिता विविध पातळ्यावर प्रयत्न सुरू होते. दरम्यान पिक विमा कंपनीने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरुवातीला 57 पैकी 56 मंडलातील आंबा या पिकाला आणि 46 मंडळातील काजू या पिकाला 67 कोटी 94 लाख 3 हजार 480 रुपये पिक विमा मंजूर करण्यात आलेला होता.
स्वयंचलित केंद्र नसल्यामुळे काजू पिकाकरिता वगळलेल्या 10 पैकी 9 मंडलंतील शेतकऱ्यांना नजीकच्या मंडळातील नोंदणी प्रमाणे परतावामिळावा यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू होते. आता 9 मंडळाना परतावा मिळणार आहे. यामुळे पीक परताव्याच्या रकमेत एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
दरम्यान 26 ऑक्टोबर पासून सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पिक विमा परताव्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काही तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू या पिकाचा विम्याचा लाभ मिळालेला आहे. तर काही शेतकऱ्यांना आंबा पीक परतावा मिळाला आहे. या चार ते पाच दिवसांमध्ये परतावा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.