ladaki bahin yojana 6 installment. राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अमलात आणली. लाडकी बहीण योजना खूप कमी दिवसातच अतिशय लोकप्रिय देखील झाली. त्याचं कारणही तसंच आहे कारण मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या बँक खात्यावर प्रति महिना 1500 याप्रमाणे रक्कम देखील जमा केली.
त्यासोबतच महिलांना योजनेच्या सुरुवातीलाच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची पैसे एक सोबत वितरित करण्यात आले. त्यानंतर दिवाळी बोनस म्हणून तसेच आचारसंहितेचा काळात पैसे वितरित करता येणार नाहीत म्हणून राज्य शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे ऑक्टोम्बर महिन्यातच महिलांच्या बँक खात्यावर जमा केलेले आहेत.
पुढील हप्त्यासंबंधी एकनाथ शिंदेंनी दिली तारीख ladaki bahin yojana 6 installment.
राज्यामध्ये निवडणुकांचा धुमाकूळ सुरू असताना, राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांच्या मनात हा प्रश्न देखील निर्माण झाला आहे . महिलांना पुढील हप्ता महिलांच्या बँक खात्यावर कधी जमा होईल. त्यानुसारच 20 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंबंधी मतदान पूर्ण होईल व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील. यानुसारच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी ग्वाही दिली आहे की, महिलांना नोव्हेंबर महिन्यातच पुढील महिन्याचे म्हणजे सहाव्या हप्त्याचे वितरण केले जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.
हे वाचा: मागेल त्याला सौर कृषि पंप योजना. शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध
लाडकी बहीण योजना अंतर्गत आता पर्यंत किती मिळाला लाभ.
महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचा निधी महिलांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. अशा पाच महिन्याचा निधी एकूण मिळून 7500 महिलांना लाभ आत्तापर्यंत मिळालेला आहे. परंतु पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता कधी मिळणार याची देखील चिंता महिलांच्या मनात होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील हप्ता नोव्हेंबर मध्येच वितरित करणार असल्याची माहिती दिली आहे. नवीन सरकार स्थापन होईल व सरकार आमचेच येईल असा विश्वास देखील एकनाथ शिंदे यांनी दर्शवला आहे. ladaki bahin yojana 6 installment.
सरकार स्थापन झाले तरच मिळू शकतो का लाभ.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याच्या निधी नोव्हेंबर मध्ये वितरित करण्यात असल्याचा शब्द जरी दिला असला; तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होतील का ? किंवा परत त्यांच्याच पक्षाची सत्ता राज्यांमध्ये येईल का ? याचाही बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न आहे सत्ता स्थापन होण्याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर महिन्याचा निधी वितरित करणार असल्याची माहिती दिली. परंतु जर सत्ता स्थापन नाही झाली तर महिलांना निधी कसा मिळणार व कधी मिळणार याबद्दलची स्पष्टता अजून झालेली नाही.