ladaki bahin yojana : या महिलांना मिळणर 4500 रुपये; पहा कोणत्या महिला आहेत पात्र.

ladaki bahin yojana : महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना सुरू केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचे अंतर्गत राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या व पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देण्याची तरतूद शासनाने केली आहे. योजनेचे अंतर्गत महिलांना आतापर्यंत नऊ हप्त्यांची यशस्वीते वितरण झालेले आहे.

लाडकी बहीण योजना चा दहावा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यावर 2 मे 2025 पासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता देखील जमा झालेला आहे. काही महिलांना हा हप्ता अद्याप पर्यंत मिळालेला नाही. परंतु येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर हा हप्ता जमा केला जाईल.

एप्रिल महिन्याच्या हप्तदरम्यान काही महिलांना 4500 रुपये देखील मिळाले आहेत. एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करताना काही महिलांना 1500 रुपये काही महिलांना 500 रुपये तर काही महिलांना 4500 रुपयांचा वितरण शासनाकडून करण्यात आले आहे. शासन योजनेचे अंतर्गत 1500 रुपये प्रति महिन्यात येत असताना देखील पाचशे रुपये व 4500 रुपये महिलांना का मिळत आहे? हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Kanda Anudan  Kanda Anudan :कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा! 28 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर, तुम्हाला मिळणार का? लगेच पहा

एप्रिल हप्ता वाटप प्रक्रिया सुरूच

2 मे 2025 पासून राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली असल्याची माहिती विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. महिलांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र असणाऱ्या सर्व महिलांना पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व रक्कम जमा केली जाणार आहे. राज्य सरकारकडून आवश्यक निधी मंजूर करून डीबीटी विभागाकडे दिलेला आहे. डीबीटी विभागाकडून ही रक्कम महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. उर्वरित महिलांना देखील लवकरच ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.

कोणत्या महिलांना मिळाले 500

लाडकी बहीण योजना राज्य शासनाने योजना सुरू केली त्याचवेळी योजने बाबतची पात्रता नियम अटी सर्व प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसारच ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवत आहे अशा महिलांना या योजने अंतर्गत लाभ दिला जाणार नाही हा देखील नियम जोडण्यात आला होता. या नियमाच्या अनुषंगाने उर्वरित लाभ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाईल असे देखील नमूद करण्यात आले होते. त्यानुसारच राज्यातील ज्या महिलांना इतर शासकीय योजनेअंतर्गत महिन्याला 1500 रुपये पेक्षा कमी लाभ मिळत आहे.

अशा महिलांना उर्वरित लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पी एम किसान लाभार्थी महिला आणि नमो शेतकरी लाभार्थी महिला यांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये या योजनेमधून दिले जातात. पंधराशे रुपये ची भरपाई करण्यासाठी त्यांना उर्वरित 500 रुपये लाडकी बहीण योजने अंतर्गत वितरित केले जात आहेत.

हे पण वाचा:
Protsahan Anudan शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 50 हजार प्रोत्साहन योजना सुरू, पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ.Protsahan Anudan

4500 कोणाला मिळत आहेत ladaki bahin yojana

एप्रिल चा हप्ता जमा होत असताना अनेक महिलांच्या खात्यावर 4500 जमा झाले आहेत. या महिलांना व इतर महिलांना देखील यांना 45 कसे मिळाले असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून राज्य शासनाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता वितरण प्रक्रिया सुरू केली होती. या वितरण प्रक्रियेमध्ये ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यावर आता फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्याचे मिळून 4500 रुपये शासनाकडून जमा केले जात आहेत.

लाडकी बहीण योजना मार्च महिन्यात हप्ता वाटप करताना ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावर आता शासनाकडून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तिन्ही महिन्याची मिळून एकूण 4500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

हे पण वाचा:
Crop Insurance Nuksan Bharpai List शेतकऱ्यांना दिलासा! 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, पहा जिल्ह्यांची यादी.Crop Insurance Nuksan Bharpai List

Leave a comment