Mock drill मॉक ड्रिल म्हणजे काय? – सोप्या भाषेत समजून घ्या

Mock drill पहलगाम हल्ला झाल्या नंतर देशांतील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क होत आहेत. देशांतील युद्धसदृश सारख्या परिस्थितीला समोरे जाण्यासाठी. गृह मंत्रालयाने दिनांक 7 मे रोजी माँक ड्रिल घेण्याचे आयोजन केले आहे. मॉक ड्रिल म्हणजे नेमक काय असते आणि हे कोनत्या ठिकाणी घेतले जाणार याची माहिती घेवूया.

Mock drill

मॉक ड्रिल म्हणजे एक सराव असतो. आपत्कालीन परिस्थिती – जसं की आग लागणे, भूकंप, दहशतवादी हल्ला, पूर अशा प्रसंगात लोकांनी काय करायचं, कोठे जावं, कसं वागावं याचा प्रत्यक्ष सराव म्हणजे मॉक ड्रिल.

mock drill उदाहरण:

समजा, एखाद्या शाळेत आग लागल्याची सूचना दिली जाते (फक्त सराव म्हणून). मग शिक्षक मुलांना सांगतात की वर्ग सोडून लगेच मैदानावर जावं. सगळे मुलं रांग लावून बाहेर पडतात. फायर ब्रिगेड, डॉक्टर, पोलीस असे सर्व सेवकही सरावासाठी येतात. हा सगळा प्रकार म्हणजेच मॉक ड्रिल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मॉक ड्रिल का केली जाते?

  • खरी संकटाची वेळ आली, तर घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्यासाठी.
  • फायर ब्रिगेड, पोलीस, डॉक्टर यांचं वेळेवर पोहोचणं तपासण्यासाठी.
  • एखादं ठिकाण सुरक्षित आहे का, याची पडताळणी करण्यासाठी.
  • नागरिकांना शिस्तीने वागण्याचा सराव करून देण्यासाठी.

मॉक ड्रिल कुठे केली जाते?

  • शाळा
  • ऑफिस
  • हॉस्पिटल
  • विमानतळ
  • मॉल
  • कारखाने

7 मे रोजी कोठे होणार मॉक ड्रिल

दिनांक 7 मे 2025 रोजी राज्यात एकूण 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे. राज्यातील कोणत्या सोळा ठिकाणी होणार आहे यांची यादी खालील प्रमाणे.

  • मुंबई
  • उरण
  • तारापूर
  • ठाणे
  • पुणे
  • नाशिक
  • रोहा नागोठणे
  • छत्रपती संभाजीनगर
  • मनमाड
  • सिन्नर
  • पिंपरी चिंचवड
  • भुसावळ
  • थळ वायशेत
  • सिंधुदुर्ग
  • रत्नागिरी
  • रायगड

थोडक्यात:

मॉक ड्रिल म्हणजे “खरं संकट नसेल तरी त्या संकटाचा सराव करणं”. नागरीकांना आणि शासकीय यंत्रणेला आपत्कालीन संकटाला समोरे जाण्याचे पूर्व प्रशिक्षण होय.
जसं आपण परीक्षा होण्याआधी टेस्ट पेपर सोडवतो, तसंच हे पण एक टेस्ट असते – पण जिवंत सरावाची! गृहमंत्रालय या mock drill च्या माध्यमातुन सरकारी कर्मचारी आणि नागरिक यांना संकटकालीन परीस्थिती मध्ये कशी कारवाही करायची याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते.

हे वाचा: महिंद्रा चा कमी खर्चात चालणारा ट्रॅक्टर