मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये. ladki bahin 2100.

ladki bahin 2100 निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा सरकारने निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये या प्रमाणात लाभ दिला जात आहे. या मध्ये नोंदणी केलेल्या महिलांना प्रती महिना 1500 या प्रमाणात 5 महिन्याचे 7500 रुपये देखील वितरित केले आहेत. परंतु आता या योजनेबाबत नवीन घोषणा समोर आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये देणार असल्याची माहिती जाहीरनाम्यात केली आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहूया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपया ऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर मधील महायुतीच्या प्रचार सभेत केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महायुतीच्या प्रचार सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


ladki bahin 2100 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे म्हणाले की, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणूनच राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे आणि त्यांनी कोल्हापूर मधील महायुतीच्या प्रचार सभेत अनेक अनेक घोषणा जाहीर केल्या.

ladki bahin 2100 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणा

त्यांनी महिला सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील महायुतीच्या प्रचार सभेत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे म्हणाले की, शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे. या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना अंतर्गत वर्षाला पंधरा हजार रुपये वितरित केले जाणार आहे. त्याचबरोबर एम एस पी वर 20% अनुदान देण्याचा देण्याचा निर्णय घेतलेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढील भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की, या राज्यामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही किंवा झोपणार नाही प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन आम्ही या ठिकाणी तुम्हाला देत आहोत. या महाराष्ट्र राज्यामध्ये कुणी भुकेला राहता कामा नये हे आमचे प्रमाणित भावना आहे. त्याचबरोबर वृद्ध पेन्शन धारकांना

1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेत आहोत. त्याचबरोबर बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता ते देखील आता आम्ही त्याचे पुनरावृत्ती या ठिकाणी करत आहोत.

हे वाचा: पेन्शन धारकांसाठी महत्वाची माहिती


महाराष्ट्र राज्यात दहा लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. यामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती. तसेच दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजेच स्टायफंड पणदेण्याचा देखील निर्णय घेत असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापुरातील प्रचार सभेतील अनेक निर्णय

  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपया ऐवजी 2100 रुपये मिळणार.
  • 25000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय घेणार आहोत.
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी.
  • सन्मान योजना वर्षाला 15 हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • एम एस पी वर 20% अनुदान देण्यात येणार आहे. असा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्यामध्ये अन्न आणि निवारा देण्याची वचनही देण्यात आलेली आहे.
  • वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपये वरून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
  • जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Leave a comment