लाडकी बहीण मोठी खुशखबर! GR आला ऑगस्टचा हप्ता या दिवशी जमा होणार? Ladki Bahin August Installment

Ladki Bahin August Installment : महाराष्ट्रातील लाडकी बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरणाबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) २४ सप्टेंबर रोजी जारी झाला आहे. अनेक महिलांना “योजना बंद झाली का?”, “पैसे कधी येणार?” अशी चिंता होती, पण आता मार्ग मोकळा झाला आहे.

GR मध्ये काय आहे?

या GR नुसार अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील काही महिला लाभार्थ्यांसाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै महिन्यात ज्या बहिणींना १५०० रुपये मिळाले होते, त्यांना ऑगस्टचाही १५०० रुपये हप्ता मिळणार आहे. सध्या एकत्रित ३००० रुपये (ऑगस्ट + सप्टेंबर) मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आत्ताच्या GR मध्ये मुख्यतः ऑगस्टच्या हप्त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यात सुमारे १ कोटी ६० लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांची संख्या थोडी कमी-जास्त होत असल्याने यावेळीही काही महिलांना पैसे मिळू शकतात किंवा काही तात्पुरते अडकू शकतात. त्यामुळे आपले आधार कार्ड, बँक खाते लिंकिंग आणि इतर कागदपत्रे तपासून ठेवा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पैसे कधी जमा होतील?

GR आल्यानंतर सहसा एक-दोन दिवसांत वितरण सुरू होते. मात्र सध्या बँकांमध्ये सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस संप झाल्याने थोडी उशीर होण्याची शक्यता आहे. बँका शनिवारी खुली असतील तर शनिवारपर्यंत (२७ सप्टेंबरपर्यंत) वितरण होऊ शकते. अन्यथा २९ किंवा ३० सप्टेंबरपर्यंत पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

सरकारकडून एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात DBT वितरण करण्याची व्यवस्था असते, त्यामुळे एकदा प्रक्रिया सुरू झाली की लवकरच बहुतांश बहिणींच्या खात्यात पैसे दिसू शकतात.

महत्त्वाच्या सूचना

  • आपले आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक आहे का, हे तपासा.
  • मोबाइल नंबर अपडेट आणि DBT सक्रिय आहे का, हेही तपासा.
  • पैसे न आल्यास स्थानिक अधिकारी किंवा संबंधित पोर्टलवर चौकशी करा.
  • खोटी माहिती पसरवणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. अधिकृत GR आला आहे, योजना सुरू आहे.

लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरेल. जुलैचा हप्ता मिळालेल्या बहिणींना आता ऑगस्टचाही मिळणार असल्याने आनंदाची लहर आहे.