दुष्काळ अनुदान 5000 रुपये लाखो शेतकरी वगळले 1.5 कोटी शेतकरी फक्त कागदावरच ? Dushkal anudan 2026

Dushkal anudan 2026 : महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिवाळी २०२६ फार काही आनंदाची राहिली नाही. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ५००० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. एकूण १.५ कोटी शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील आणि एकूण साडेतेराशे कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाईल, असे सांगितले गेले. पण आजही अनेक गावांमध्ये ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीत. काहींना मिळाले, बहुतेकांना अजूनही प्रतीक्षा आहे.

काय होते जाहीर आणि काय झाले प्रत्यक्षात?

सरकारी जीआरनुसार १.५ कोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात सुमारे ४०-५० लाख शेतकऱ्यांनाच पैसे मिळाल्याची माहिती समोर येत आहे. बाकीच्यांना “तांत्रिक अडचणी” असल्याचे सांगितले जात आहे. पण या तांत्रिक अडचणी नेमक्या काय आहेत, हे स्पष्ट केले जात नाही.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे. पीएम किसानची दोन हजार रुपयांची हप्ता ३० तारखेला बँक खात्यात जमा झाली. डीबीटीही व्यवस्थित काम करत होते. मग दुष्काळ अनुदानासाठी अचानक काय अडथळा आला? हे प्रश्न शेतकरी वारंवार विचारत आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

दिवाळी अंधारात गेली, आता पुढचे काय?

गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि यंदा दुष्काळ या दोन सलग संकटांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न जवळपास शून्यावर आले आहे. घराचा खर्च, जनावरांचा चारा-पाणी, पुढच्या हंगामाची तयारी… सर्व काही अडचणीत आहे. अशा वेळी ५००० रुपये जरी लहान रक्कम वाटली तरी ती घरखर्च चालवण्यासाठी महत्त्वाची ठरते. अनेक शेतकऱ्यांनी पंचनामा करून कागदपत्रे जमा केली, खर्चही केला, पण अजूनही प्रतीक्षा लागली आहे.

सरकारकडून “आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत” असे वारंवार सांगितले जाते. पण दिवाळी संपली, कार्यालये खुली झाली तरी लाखो शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि निराशा वाढत आहे.

तांत्रिक अडचणी की व्यवस्थापन समस्या?

जर काही हजार किंवा लाख शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण असेल तर समजण्यासारखे आहे. पण ३५-४० लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी तांत्रिक अडचण येणे हे सामान्य नाही. फार्मर आयडी आणि डीबीटी व्यवस्थित असल्याने पीएम किसानचे पैसे आले. मग राज्य सरकारच्या या योजनेत नेमकी समस्या कुठे आहे – निधीची, विभागाची की प्रक्रियांची? याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याने शेतकरी अधिक गोंधळात पडत आहेत.

काही शेतकऱ्यांचा अंदाज आहे की जेव्हा ५००० रुपये मिळतील, तेव्हाच पुढील मोठ्या नुकसानभरपाईची प्रक्रियाही सुरू होईल. त्यामुळे या छोट्या रकमेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

शेतकऱ्यांची अपेक्षा काय?

शेतकरी फक्त इतकेच मागत आहेत की:

  • ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांची यादी सार्वजनिक करावी.
  • तांत्रिक अडचणी नेमक्या काय आहेत ते स्पष्ट सांगावे.
  • वितरण पुन्हा सुरू करावे आणि बाकीच्यांनाही मदत पोहोचवावी.

दुष्काळाच्या या काळात प्रत्येक रुपये महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याला पुढचे ७-८ महिने घर चालवायचे आहे, जनावरे जगवायची आहेत आणि पुढच्या हंगामासाठी तयारी करायची आहे. अशा परिस्थितीत केवळ जाहीरात पुरेशी नाही. मदत वेळेवर आणि सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.