ladki bahin yojana :लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी! आज पासून जमा होणार जून चा हप्ता…

ladki bahin yojana : राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली महत्त्वकांक्षी योजना म्हणजेच, मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना.30 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेल्या या योजनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मदत मिळाली आहे.ladki bahin yojana

ladki bahin yojana

योजनेच्या पहिल्या वर्षाचा प्रवास

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये एकूण 11 हप्ते वितरित करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रत्येक महिलांच्या खात्यावर 16,500 रुपये जमा झाले आहेत. या मिळालेल्या पैशाचा उपयोग अनेक महिलांनी विविध प्रकारे केला आहे. काही महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तर काहींनी घर खर्चात मदत केली. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी या योजनेमुळे छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत, ज्यामुळे त्यात अधिक आत्मनिर्भर झाल्या आहे.ladki bahin yojana

जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

जून महिना संपत आला आहे त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना उत्सुकता लागली आहे की, जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो. यासंदर्भात राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज दिली आहे. खरंतर मागील महिन्याचा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला होता त्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आता याच लाखो महिलांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी खुशखबर दिली आहे.ladki bahin yojana

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

काय म्हणाले अजित पवार?

मुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना लगेच पुढील हप्ता दिला जाणार असल्याची घोषणा अजित पवार दादा यांच्याकडून करण्यात आली आहे.
काल, 29 जून 25 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडक्या बहिणींना पुढच्या दिल्या जाणाऱ्या पुढच्या हत्या बाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवार असे म्हणाले की, राज्य सरकारने आज एकूण 3 हजार 600 कोटी रुपये

डीबीटी खात्यात ट्रान्सफर केले आहेत.

त्यामुळे आज पासून म्हणजेच 30 जून 2025 पासून म्हणजेच, आजपासून पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी सांगितले आहे.

जून आणि जुलै चा हप्ता एकत्र मिळणार का

मागील काही दिवसापासून अशी चर्चा होत आहे की जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाईल. असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला होता. जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यास उशीर होत असल्याने जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एक सोबत दिले जातील का असे मागील काही दिवसापासून म्हटले जात होते.

विशेष म्हणजे आषाढी एकादशी च्या मुहूर्तावर हे दोन्ही पैसे एकत्र दिले जातील असाही दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र आज म्हणजेच 30 जून पासून लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच आता जुलै महिन्याचा लाभ हा जुलै महिन्यात दिला जाणार आहे.ladki bahin yojana

Leave a comment