Ladki bahin yojna: या लाडक्या बहिणींचे लाड झाले 7 प्रकारच्या कारणामुळे बंद! जाणून घ्या काय आहे कारण?

Ladki bahin yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केलेली महत्वकांशी योजना आहे. या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत या योजनेला एक वर्ष पूर्ण होऊन गेले आहे. योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये देण्यात आला होता. आता सरकारकडून या योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. मागील काही महिन्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक महिला या योजनेतून बाद करण्यात आले आहेत.

Ladki bahin yojna

Ladki bahin yojna लाडकी बहीण योजना

दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी या योजने संदर्भात नुसतेच एक विधान केले आहे. त्यांनी ज्या महिलांकडे गाड्या आहेत, तसेच बंगले आहेत, त्या महिलांसाठी ही योजना नाही असे विधान करत अशा महिलांनी या योजनेतून स्वतःहून माघार घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना फक्त राज्यातील गरिबांसाठीच आहे, श्रीमंतासाठी नाही असे सुद्धा छगन भुजबळ म्हणाले. अशा परिस्थितीत आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की कोणत्या महिलांना लाभ दिला जाणार नाही याची माहिती घेऊया.Ladki bahin yojna

या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही

  • 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • ज्या महिला महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिला तसेच, ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी म्हणजेच, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही असे नियम आहेत.
  • ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही .
  • जर महिलांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरशन/ उपक्रमांकाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य असतील तर अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही .
  • आजी-माझी खासदार आमदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
  • ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही .

अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक महिला या योजनेतून वगळण्यात आले आहेत आता त्या महिलांना या योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे .लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे .त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही .Ladki bahin yojna

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Leave a comment