Leave Travel Concession :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एलटीसीमध्ये तेजस आणि वंदेभारत मध्ये करता येणार प्रवास,केंद्र सरकारचा निर्णय.

Leave Travel Concession : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत (LTC) अंतर्गत तेजस, वंदे भारत आणि हमसफर ट्रेन मधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (Dopt) विविध कार्यालये/व्यक्तीकडून LTC( Leave Travel Concession ) अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्स मध्ये प्रवासाची परवानगी देण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करण्याचा निर्णय

प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला , DoPT ने जाहीर केले की, राजधानी, शताब्दी, आणि दुरांतो गाड्यांच्या व्यतिरिक्त, आता सरकारी कर्मचाऱ्यांना तेजस एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी असेल . या निर्णयामुळे कर्मचार्यांना अधिक आरामदायक आणि प्रीमियम प्रवासाचा अनुभव मिळेल.

हे वाचा : महाराष्ट्रात एक व्यक्ति किती जमीन खरेदी करू शकतो; पहा काय आहे नियम ?

हा निर्णय घेण्यामागचे कारण काय ?

कार्मिक विभागाला विविध कार्यालय आणि कर्मचाऱ्यांकडून अनेक सूचना मिळाल्या होत्या, ज्यात एलटीसी (Leave Travel Concession) अंतर्गत प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवास करण्याची मागणी केली जात होती. या सूचनांचा विचार करून, सरकारने हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे कर्मचार्यांना अधिक सुवीधी प्रवास मिळेल.

हे नियम कशाप्रकारे कार्य करतील?

या निर्णयानुसार, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार एलटीसीच्या (Leave Travel Concession) अंतर्गत तेजस एक्सप्रेस,वंदे भारत एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळेल. तसेच, त्यांना प्रवासाच्या खर्चाची परतफेड देखील केली जाईल.

एलटीसी म्हणजे काय?

एलटीसी (Leave Travel Concession) ही एक सरकारी योजना आहे जी भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत देशभर प्रवास आणि प्रवास खर्चाचा लाभ देण्याची संधी देते . या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि देशाच्या विविध भागात प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे . LTC चा लाभ घेणाऱ्या पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजेविकिरिक्त ,इतर प्रवासासाठी तिकिटावर झालेल्या खर्च परत मिळतो.

1 thought on “Leave Travel Concession :सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एलटीसीमध्ये तेजस आणि वंदेभारत मध्ये करता येणार प्रवास,केंद्र सरकारचा निर्णय.”

Leave a comment

Close Visit Batmya360