Crop Insurance Advance : खरीप 2024 मध्ये पिक विमाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अग्रीम (Crop Insurance Advance) देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने यास मान्यता दिली असून, भारतीय कृषी विमा कंपनीला शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Crop Insurance Advance 6 लाख 59 हजार शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा अग्रिम
मागच्या वर्षी 1 जून नंतर चांगला पाऊस झालेला होता .पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या लवकरच पूर्ण केल्या होत्या .त्यामुळे गेल्या वर्षी पिक विमा लवकरच भरण्यास सुरुवात झाली होती .1 जुलै ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये 17 लाख 14 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला होता .जुलै अखेर,ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला .
Crop Insurance Advanceनैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान
जुलै ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आणि पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. 2 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतरच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान झाले होते .
समितीचे निर्णय आणि नुकसान भरपाई
त्या अनुषंगाने, 9 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारींचा विचार करण्यात आला. विमा संरक्षित क्षेत्रात 25 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे, समितीने संम्पल सर्व्हे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पीकनिहाय विमा क्षेत्राचा अहवाल विमा कंपनीच्या वतीने समितीसमोर सादर करण्यात आला.
सदरील अहवालानंतर, समितीने त्या अहवालाची सखोल चर्चा केली आणि सर्व विमा क्षेत्राच्या सर्वेक्षण अहवालाला सर्वानुमते मान्यता दिली. त्यामुळे, समितीने भारतीय कृषी विमा कंपनीला निर्देश दिले की, सर्व मंजूर शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान (Crop Insurance Advance) भरपाई अदा करावी. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवरील नुकसानीचा योग्य मोबदला मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने पार पडेल.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी
बीड जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आलेल्या 6 लाख 59 हजार शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम दिला जाईल, तर दोन लाख 44 हजार शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीनुसार विमा रक्कम दिली जाणार आहे . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सनियंत्रण समितीने मंजूर केलेल्या याद्यांना विमा कंपनीच्या मुख्य कार्यालयास पाठविण्यात आले आहेत. शासनाचा हिस्सा प्राप्त झाल्यानंतर, शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त (Crop Insurance Advance) शेतकऱ्यांना निधी मंजूर करून प्राप्त होणार आहे.
….अशी आहे पात्र शेतकरी संख्या
तालुका | अग्रीमपात्र शेतकरी | नुकसान पात्र शेतकरी |
आंबेजोगाई | 557114 | 10576 |
आष्टी | 19443 | 55078 |
बीड | 93716 | 42973 |
गेवराई | 153684 | 5719 |
धारूर | 38732 | 329335 |
केज | 65593 | 25836 |
माजलगाव | 654115 | 14093 |
परळी | 56614 | 15187 |
पाटोदा | 26345 | 18118 |
शिरूर | 53002 | 18558 |
वडवणी | 31466 | 5387 |
एकूण | 659724 | 244460 |
या अग्रीम पिक विमामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळणार आहे आणि त्यांना आपला आर्थिक कच निवारण्याची संधी मिळेल.
1 thought on “Crop Insurance Advance :शेतकऱ्यांना पिक विमा अग्रिम मिळणार लवकरच ,पहा सविस्तर”