Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आल्यापासून आत्तापर्यंत चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेच्या लागू झाल्यानंतर काही महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु योजनेच्या निकषांमध्ये अपात्र ठरण्याच्या भीतीने जवळपास 4000 महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल मोठे वक्तव्य केले असून, सरकारने कोणाचेही पैसे परत घेण्याचा विचार नाही, असे स्पष्ट केले आहे. पन मात्र, पुढील काळात या योजनेचा फायदा केवळ योग्य पात्र महिलांनाच मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर महिलांचे अर्ज भरून घेतले. पण त्यावेळेस पात्रता निकषात बसत नसलेल्या महिलांकडून अर्ज भरून घेण्यात आले होते. शासनाने निवडणुकीच्या तोंडावर पडताळणी न करता सरसकट अर्ज भरून महिलांना लाभ दिला आहे. पण मात्र आता निकषात न बसणाऱ्या महिलांच्या तक्रारी आल्यामुळे आता पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी केल्यानंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana रक्कम वसूल करण्याची भीती
राज्यभरातून लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांनी पैसे नको म्हणून अर्ज माघारी घेतले आहेत. सरकारने पडताळणी करण्या अगोदरच माघार घेण्यात आली आहे कारण की, आतापर्यंत या योजनेअंतर्गत मिळालेली पैसे परत करावे लागतील याच भीतीने अनेक महिलांनी आतापासूनच लेखी अर्ज देऊन लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत. अर्ज माघार घेण्याचे कारण म्हणजे पडताळणी नंतर अपात्र ठरल्यास मिळालेली लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्याच्या भीतीने अर्ज माघार घेत असल्याचे दिसून येत आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातून अनेक महिलांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचा : अखेर पालकमंत्री पदाची घोषणा
Ladki Bahin Yojana लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज शासकीय कार्यालयात
स्थानिक पडताळणी वरील शासकीय कार्यालयात या योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत, अशी माहिती आहे. राज्यामध्ये लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राबविण्यात आल्यापासून दोन कोटी 63 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. त्या अर्जापैकी दोन कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरले आहे. पात्र ठरलेल्या पैकी दोन कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना विधानसभा निवडणुकी अगोदरच पाच महिने दरमहा 1500 रुपये देण्यात आले होते. पडताळणी नंतर 3 ते 4 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Ladki Bahin Yojana योजनेच्या पडताळणीवर विचार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी अपात्र असतानाही अर्ज केलेल्या महिलांसाठी आता शासनाने एक सुविधा उपलब्ध केलेली आहे ती म्हणजे पोर्टल पुन्हा खुले केले आहे. अपात्र महिलांना आता पोर्टलवर लाभबंध करण्याचा अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्य सरकारला या योजनेसाठी दर महिन्याला 3 हजार 750 कोटी रुपये द्यावे लागतात.

अपात्र ठरणाऱ्या महिलांसाठी या योजनेचे पोर्टल पुन्हा येता खुले करण्यात आले आहे, त्या पोर्टलवर 1 ते 15 ऑक्टोंबर पर्यंत प्राप्त अर्जाची पडताळणी करून त्याला मंजुरी देणे, ज्या महिलांनी लाभ नको म्हणून अर्ज केले, त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करून त्यावर निर्णय घेणे अशा सूचनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ज्या महिलांना योजनेतील लाभ थांबवण्याची इच्छा आहे, त्या महिलांना तालुका आणि जिल्हा पातळीवरील संबंधित कार्यालयांमध्ये लेखी (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची सुविधा दिली आहे.
Ladki Bahin Yojana या संकेतस्थळावर करता येणार अर्ज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पात्र नसताना पण ज्या महिलांनी अर्ज केले आहेत , त्यांनी स्वतःहून लाभासाठी पात्र नसल्याचे योजनेच्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ‘तक्रार निवारण’ या पर्यायात ऑनलाइन भरून द्यायचे आहे.
Ladki Bahin Yojana सरकार परत पैसे घेणार का?
ज्या23
महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत त्यांनी स्वतःहून पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत. आदिती तटकरे यांनी “योजना नको” असलेले अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, “सरकार कुणाचेही पैसे माघारी घेणार नाही. आम्ही केवळ अपात्र महिलांना या योजनेचा लाभ देणार नाही. आम्ही योजनेची पडताळणी करत आहोत आणि योग्य पात्र महिलांना त्याचा लाभ देत राहू.” तसेच, महिलांना “लाडकी बहीण” योजनेतील मिळवलेले पैसे परत करण्याची आवश्यकता नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे
Ladki Bahin Yojana योजनेचा सातवा हप्ता
लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम या योजनेत पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यावर पाठवण्यात आलेली आहे.1500 रुपयाप्रमाणे डिसेंबर महिन्यात 2 कोटी 52 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर यादरम्यान देण्यात आली होती. आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की 26 जानेवारी च्या अगोदर पासून 7 व्या हप्त्याची रक्कम वितरित करण्यात असल्याचं म्हटलं आहे.
निष्कर्ष
राज्यातील लाडकी बहीण योजना त्याच्या उद्देशाला अनुसरून महिलांना आर्थिक सहाय्य देण्याचा एक उपक्रम होता. पण काही महिलांनी अपात्र ठरण्याच्या भीतीने योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सरकारने ही चिंता नाकारली असली तरी, योग्य महिलांना लाभ देणे आणि अपात्र महिलांना वगळणे आवश्यक आहे. आदिती तटकरे यांनी योजनेच्या तपासणीसाठी आणि पडताळणीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. Ladki Bahin Yojana
1 thought on “Ladki Bahin Yojana :पडताळणी अगोदरच 4000 लाडक्या बहिणीची माघार; पैसे परत घेण्यावर अदिती तटकरेंच मोठं वक्तव्य”