LIC Policy News: LICची पाॅलिसी घेतली आहे? तर सावधान रहा! एक SMS आणि आयुष्यभराची कमाई एका झटक्यात गमवालं

LIC Policy News : सध्या कोणालाही कॉल लावल्यानंतर सायबर क्राईमची माहिती देणारी सूचना आपल्याला पहिल्यांदा ऐकायला मिळते. सायबर गुन्हेगारी थांबवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीपण सायबर क्राईमच्या घटना कमी होताना दिसत नाही. आता ही गुन्हेगारी बँक ग्राहकांनंतर एलआयसी (LIC Policy News) पॉलिसी धारकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे . एलआयसी ग्राहकांना सायबर फसवणूक पासून सावध राहण्याचा सल्ला भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिला आहे .

LIC Policy News

कशी केली जाते फसवणूक?

LIC पॉलिसीधारकांची फसवणूक करण्यासाठी LIC पॉलिसी धारकांना तुमच्या पॉलिसीवर बोनस मिळणार आहे. असे आमिष दाखवले जाते. त्यासाठी तुम्हाला पॉलिसी क्रमांक, बँक तपशील किंवा KYC माहिती विचारली जाते. एलआयसी कधीपण त्या ग्राहकांना बँकेशी संबंधित असणारी माहिती कॉल करून किंवा एसएमएस, व्हाट्सअप ईमेल द्वारे विचारत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला कोणी व्यक्ती किंवा संस्था अशी माहिती विचारत असेल तर ती फसवणूक आहे, अशी माहिती एलआयसी कडून देण्यात आली आहे.LIC Policy News

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : दहावी पास असलेल्या महिलांसाठी सुवर्णसंधी !सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या,3 वर्षात 2 लाखांहून अधिक पैसे कमवा…

एलआयसीच्या ग्राहकांना आव्हान

एलआयसी ने सार्वजनिक नोटीस जारी केली आहे. एलआयसी (LIC Policy News) ग्राहकांनी कोणत्याही अनोळखी कॉल किंवा संदेश, ई-मेलवर विश्वास ठेवू नका . तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला ते एलआयसी कडून तुम्हाला आर्थिक नफा दिला जात आहे, असलेल्या अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नका. एलआयसी ने आपल्या ग्राहकांना असा इशारा करण्यात आला आहे की, ग्राहकांनी त्यांच्या पॉलिसीचे तपशील , बँकिंग माहिती किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा संस्थेला देऊ नये. असा इशारा दिला आहे. त्याशिवाय ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एलआयसीने आपल्या अधिकृत WhatsApp क्रमांक 8976862090 देण्यात आला आहे. ज्यामुळे ग्राहक त्यांच्या शंकांचे निरसन करू शकतात.

जर तुम्हाला फेक कॉल किंवा मेसेज आल्यावर काय करावे?

जर एखाद्या एलआयसीच्या ग्राहकाला बनावट कॉल किंवा मेसेज आला तर त्या ग्राहकाने लगेच LIC spuriouscalls@licindia.com यावर कडून शकतात. याशिवाय तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम https://cybercrime.gov.in/ पोर्टलवर देखील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार नोंदवता येऊ शकते . किंवा तुम्हाला सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करून मदत देखील घेता येऊ शकते. अशा प्रकारची सायबर ची फसवणूक टाळण्यासाठी एलआयसीच्या ग्राहकांनी नेहमी सावध राहून फक्त अधिकृत वेबसाईटच वापरावी, असा सल्ला LIC कंपनीने दिला आहे.LIC Policy News

Leave a comment

Close Visit Batmya360