lsg vs csk आज दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी आयपीएल 2025 चा 30 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जॉइंट या टीमच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी या क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहेत. हा सामना रात्री साडेसात वाजता सुरू होणार आहे.

lsg vs csk संघाची स्थिती
आयपीएल 2025 च्या टेबल मध्ये लखनऊ हा संघ चौथ्या क्रमांकावरचा संघ आहे. त्यांनी आजपर्यंत खेळलेल्या सहा सामन्यापैकी चार सामने जिंकलेले आहेत. दुसरीकडे आयपीएल संघाचे महत्त्वपूर्ण टीम चेन्नई सुपर किंग यांची यावर्षी अतिशय खराब खेळ खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग ने एकूण सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त एक सामना चेन्नई सुपर किंगला जिंकता आलेला आहे. यानुसार 2025 आयपीएलच्या टेबल पॉइंट मध्ये चेन्नई सर्वात खालच्या स्तरावर आहे. लखनऊ आणि चेन्नई यांच्यामध्ये आजपर्यंत एकूण पाच सामने झाले आहेत. त्यापैकी लखनऊ टीमने तीन सामने जिंकले आहेत. एक सामना अ निर्णयत राहिला आहे. चेन्नई सुपर किंगला पाच सामन्यापैकी फक्त एक सामना जिंकता आला आहे.
lsg vs csk हवामान अंदाज
सामना पूर्ण होण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असणार म्हणजे हवामान. हवामानाच्या दृष्टीने सामन्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. हवामानाच्या अनुषंगाने अनेक सामने रद्द झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. परंतु आज लखनऊ मध्ये हवामान अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित असणार आहे. संध्याकाळच्या सुमारास तापमान 27 अंश सेल्सिअसच आसपास असेल. पावसाची या ठिकाणी कोणतीही शक्यता दर्शवली जात नाही. यामुळे हा सामना पूर्ण करण्यासाठी कोणतीही हवामानाची अडचण निर्माण होणार नाही. हवामान व्यवस्थित असल्यामुळे सामना खेळण्यासाठी वातावरण अगदी चांगली असेल.
दोन्ही संघाचा आयपीएल 2025 मधील निकाल
- लखनऊ सुपर जॉईंट:- W,W,W,L,W
- चेन्नई सुपर किंग :- L,L,L,L,L
lsg vs csk चेन्नई सुपर किंग साठी हा सामना करो या मरो या पद्धतीचा ठरणार आहे. सलग पाच पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नई टीमला आता जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे संघाची जबाबदारी आलेली आहे. मागच्या सामन्यामध्ये या जबाबदारीतून संघ विजयी ठरेल असे सर्वांचे मनात निर्माण झाले होते. परंतु संघाला यामध्ये यश मिळवता आले नाही. महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली आज दुसरा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग यश मिळेल अशी अपेक्षा आहे.
lsg vs csk संभाव्य खेळाडू
चेन्नई सुपर किंग:- डेव्हॉन कॉनवे, एमएस धोनी (कर्णधार), शिवम दुबे, दीपक हूडा, रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा, जीत शंकर, रविचंद्रन अश्विन, मथीशा पथिराना, नूर अहमद, खलील अहमद
लखनऊ सुपर जॉइंट :- निकोलस पूरन (विकेटकीपर), ऋषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, हिम्मत सिंह, डेविड मिलर, एडन मार्कराम, अब्दुल समद, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आकाश दीप, शार्दूल ठाकूर
महेंद्रसिंग धोनी यांच्या कर्णधार पदावर परत आगमन झाले आहे. महेंद्रसिंग धोनी यांचे नेतृत्वामध्ये चेन्नई सुपर किंग च्या कामगिरीमध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. आजच्या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंगला जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जॉईंट या टीम चा आत्मविश्वास कायम आहे. यामुळे त्यांचा खेळ देखील अधिक मजबूत राहणार आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेता आजचा खेळ अतिशय रंगतदार ठरेल अशी अपेक्षा.