Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा ,तर असा करा ऑनलाइन अर्ज.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. आणि सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा. तर या योजनेची माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे विश्रसनीय स्रोत आहे. पण सिंचनासाठी वीज उपलब्ध नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सिंचनासाठी सोलार पंप बसवण्यात येणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana योजनेची वैशिष्ट्ये

  • शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी योजना.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त 10% खर्च देऊन सौर पॅनल चा संपूर्ण संच आणि कृषी पंप मिळू शकतात.
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना फक्त 5% खर्च भरावा लागेल.
  • उर्वरित खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार करतात .
  • जमिनीच्या आकारानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जातील.
  • विम्यासह पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी चा समावेश आहे.
  • विज बिलाची काळजी करण्याची गरज नाही.
  • सिंचन वापरासाठी दिवसा वीज हमी दिली जाते.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana लाभार्थ्यांची निवडीचे निकष

  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना 2.5 एकर पर्यंत जमीन असेल तर 3 हॉर्स पावर ( HP) पर्यंतचे सौर पंप मिळतील. तसेच, 2.51 ते 5 एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 5 एचपी पंप दिला जाणार आहे. आणि 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी पंप दिला जाणार आहे. (तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी ऊर्जा असलेला पंप देखील घेऊ शकतात)
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर , आणि नद्या किंवा नाल्याजवळील शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
  • या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरवेल किंवा नद्या पाण्याचा विश्वासनीय स्रोत शेतकऱ्यांच्या जागेवर असणे आवश्यक आहे .
  • ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच्या सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही (जसे की, अटल सौर पंप योजना, मुख्यमंत्री सौरभ पंप योजना) ती शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana आवश्यक कागदपत्रे

  • सौर पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा (जलस्रोताची नोंदणी आवश्यक आहे) अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकता मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा/मालकाचा ना हरकत दाखला रु.200/- च्या स्टॅम्प पेपरवर देणे बंधनकारक आहे.
  • शेतकऱ्यांचे आधार कार्ड
  • शेतकऱ्यांची बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी)
  • पाण्याचा स्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भूजल संरक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana अर्ज करण्याची प्रक्रिया

  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर लाभार्थी सुविधा या बटनावर क्लिक करून अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अर्ज करा मध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि जमिनीची माहिती, रहिवासी पत्ता, जलस्रोत/सिंचन माहिती, कृषी तपशील, अगोदर असलेल्या पंपाचा तपशील, लागणाऱ्या पंपाचा तपशील, बँक तपशील, घोषणापत्र आणि कागदपत्रे हे सर्व अपलोड करून अर्ज सबमिट करा या बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पोचपावती मिळेल ज्याचा वापर करून तुम्हाला अर्जाची स्थिती पाहू शकतात आणि रक्कम भरणा करू शकतात.

अर्ज कसा करावा पहा सविस्तर माहिती

हेल्पलाइन नंबर

एखाद्या शेतकऱ्यांना जर ऑनलाईन अर्ज करताना खूप साऱ्या अडचणी आल्यास त्यांनी तालुकास्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. मदतीसाठी शेतकरी 1800-233-3435 किंवा 1800-212-3435 या टोल फ्री नंबर वर कॉल करू शकतात.Magel Tyala Saur Krushi Pump Yojana


Leave a comment

Close Visit Batmya360