Matoshri panand raste Yojana:आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा!जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय,पहा सविस्तर.

Matoshri panand raste Yojana : गावातील बंद होत असलेले शिवार रस्ते (गाडी मार्ग) व वहिवाटीने पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे . हा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पोलिस बळाचा वापर करण्याच्याही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. तर आज आपण या लेखामध्ये गावातील बंद होत असलेला शिवार रस्ता आणि वही वाटीणे पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा मार्ग याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Matoshri panand raste Yojana

Matoshri panand raste Yojana समस्येची पार्श्वभूमी

Matoshri panand raste Yojana शेतीच्या विभाजनामुळे शिवार रस्ते आणि पायवाट बंद होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. गावांच्या हद्दीतील या रस्त्यांवरून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेता मध्ये येण्या-जाण्याचा मार्ग बंद होत आहे. यामुळे अनेक प्रकरणे प्रशासन स्तरावर प्रलंबित राहिली आहेत.या प्रकरणाचे स्थळ निरीक्षण करणे, मोजणी करणे तसेच सुनावणी घेणे बंधनकारक आहे. यामधून तर रस्त्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याविषयी योग्य ती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज यांनी एक परिपत्रक जारी केले आहे.

हे वाचा : बचत गटांना आता मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ.

Matoshri panand raste Yojana जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे मुख्य मुद्दे

  • रस्त्यांची रुंदी:
    • गावातील पायवाटा – सव्वाआठ (८.२५) फूट रुंद.
    • ग्रामीण गाडी मार्ग – १६ ते २१ फूट रुंद.
  • ग्रामस्तरीय कार्यवाही:
    • गावचे तलाठी व सरपंच यांनी शिवार रस्ते आणि पायवाटांचा शोध घेऊन त्याबाबतचा अहवाल तयार करावा.
    • भोगवटाधारकांसमवेत बैठक घेऊन समजूत काढावी.
  • पोलिस बळाचा वापर:
    • भोगवटाधारक सहकार्य करीत नसल्यास पोलिसांच्या मदतीने रस्ता खुला करण्याच्या सूचना.
  • कायदेशीर कार्यवाही:
    • शेवटी न्यायालय अधिनियम १९०६ च्या कलम ५ व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ नुसार कार्यवाही केली जाईल.

वेळ आली तर पोलीस बाळाचा वापर

पाणंद रस्त्यांना ग्रामीण भाषेत शिवार रस्तेही म्हटले जाते . या रस्त्यासह पायवाटा,ग्रामीण गाडी मार्ग (पोट खराब) रस्ते मोकळे करण्यासाठी गावचे सरपंचतसेच तलाठी,तहसीलदार, बोडीओ एकत्रितपणे बैठक घेतली आणि तरी मार्ग मोकळा नाही झाला तर पोलिसांच्या सहकार्याने हा मार्ग मोकळा करण्याची आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत.

Matoshri panand raste Yojana कामकाजाचे टप्पे

  1. २० ते २४ डिसेंबर:
    • तलाठ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून पायवाट किंवा वहिवाट असलेल्या रस्त्यांची माहिती गोळा करावी.
  2. २४ ते २६ डिसेंबर:
    • गावातील सर्व मार्गांची पाहणी करून बंद रस्त्यांची यादी तयार करावी.
  3. २७ ते ३१ डिसेंबर:
    • बंद रस्त्यांच्या भोगवटाधारकांची यादी तयार करावी.
  4. १ ते ५ जानेवारी २०२५:
    • भोगवटाधारक व सरपंचांच्या सहकार्याने रस्ता खुला करण्याचा प्रयत्न करावा.
  5. ६ ते १५ जानेवारी:
    • पोलिसांच्या सहाय्याने बंद रस्ते खुले करावेत.
  6. १५ ते ३१ जानेवारी:
    • तरीही रस्ता खुला न झाल्यास कायदेशीर मार्गाने कार्यवाही करावी.

निष्कर्ष

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या निर्णयामुळे पाणंद रस्त्यांचा मार्ग खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, तसेच गावांतर्गत येण्या-जाण्याच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.Matoshri panand raste Yojana

2 thoughts on “Matoshri panand raste Yojana:आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा!जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय,पहा सविस्तर.”

Leave a comment

Close Visit Batmya360