Cotton Rate : पपई आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पपईच्या दरात मोठी घसरण झाली असून कापसाचे दर देखील क्विंटलमागे 600 रुपयांनी घसरले आहेत. कापसाचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च पण निघेना झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
कापूस(Cotton Rate)आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा नाही
शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव (Cotton Rate) मिळावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कापूस आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याऐवजी सातत्याने घसरण होत आहे. कापसाच्या दरात पुन्हा 600 रुपयांची घट झाली आहे, ज्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पपईच्या दरातही मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे, ज्यामुळे पपई उत्पादक शेतकरीही हवालदिल झाले आहेत.
हे वाचा : आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा!जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय,पहा सविस्तर.
पपई उत्पादक उत्तमराव कल्याणराव यांचा अनुभव
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील उत्तमराव कल्याणराव यांनी त्यांच्या एका एकर जमिनीत पपईची लागवड केली होती. त्यासाठी त्यांना सुमारे दीड लाख रुपये खर्च आला होता . त्यांनी या पिकातून जवळपास पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळेल , अशी अपेक्षा केली होती.पन मात्र, सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पपईच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तमराव यांनी सांगितले की, “लागवडीसाठी केलेला खर्च निघणेदेखील कठीण झाले आहे. पूर्वी पपईला चांगला भाव मिळत होता, पण आता पपईची गुणवत्ता घसरली असून बाजारभावदेखील कमी झाला आहे.” सध्या बाजारात पपईला फक्त 8-10 रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे .त्यामुळे पपई उत्पादक शेतकरी नाराज झालेला आहे.
कापसाच्या दरातील सततची घसरण
नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील यंदा समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या(Cotton Rate) अपेक्षेने कापूस साठवून ठेवला आहे, पन मात्र बाजारात दर सातत्याने घसरत आहेत.
जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कापसाला 7,500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत होता. परंतु सध्या तो 6,900 रुपयांवर घसरला आहे, म्हणजेच क्विंटलमागे 600 रुपयांची घसरण झाली आहे. या स्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांसाठी उपाययोजना आवश्यक
शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पपई आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. पिकांना चांगला बाजारभाव मिळावा आणि वातावरणीय बदलांच्या परिणामांवर मात करण्यासाठी तांत्रिक मदत आणि आर्थिक सहाय्य देणे अत्यावश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मालासाठी हमीभाव सुनिश्चित करावा, यामुळे त्यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळू शकेल.Cotton Rate