maha dbt : राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांचा एकाच ठिकाणी लाभ वितरित करण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टल लॉन्च केले. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेती विषयक सर्व घटकांना अनुदान मिळवण्यासाठी येथे अर्ज करणे आवश्यक असतं. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले. ज्यामध्ये शेती अवजारे खते बी बियाणे ठिबक सिंचन विहीर पाईपलाईन तुषार सिंचन यासारख्या विविध शेतकरी कल्याणकारी योजना या पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. हे पोर्टल सध्या बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. हे पोर्टल सरकारकडून बंद करण्यात आले आहे का आता नव्याने शेतकऱ्यांना कोणत्या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार नाहीत का? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
महाडीबीटी (maha dbt) पोर्टल हे कायमस्वरूपी बंद केले नसून त्यामध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्याचे हेतूने हे पोर्टल बंद करण्यात आले आहे. सर्व तांत्रिक सुधारणा पूर्ण केल्यानंतर हे पोर्टल शेतकऱ्यांसाठी परत नव्याने सुरू केले जाईल. हे पोर्टल 15 एप्रिल पर्यंत परत शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येईल अशी माहिती देखील कृषी विभागाने जाहीर केली आहे.

अर्ज प्रक्रिया बंद
महाडीबीटी पोर्टलवर नव्याने अर्ज सादर करणे सध्या बंद आहे. हॉटेलमध्ये काही तांत्रिक बदल करून हे पोर्टल परत शेतकऱ्यांसाठी खुले केले जाणार आहे. तांत्रिक बदल प्रक्रिया सुरू असल्यामुळे नवीन अर्ज करणे हा पर्याय बंद करण्यात आलेला आहे. लवकरच सर्व तांत्रिक बदल पूर्ण करून शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टल व चांगल्या स्थितीमध्ये सुरू करण्यात येईल. पोर्टल व्यवस्थित सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने अर्ज देखील सादर करता येतील.maha dbt
हे वाचा : maha dbt महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना
सुधरणा काय होणार
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला महाडीबीटी पोर्टल मध्ये काही तांत्रिक सुधारणा केल्या जातात. त्याचप्रमाणे याही वर्षी म्हणजेच 2024-25 हे वर्ष संपल्यानंतर महाडीबीटी (maha dbt) पोर्टलमध्ये काही सुधारणा केल्या जाणार आहेत. या केल्या जाणाऱ्या नव्या सुधारणा शेतकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या हेतूने राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना अर्ज करतानाच्या विविध अडचणी निर्माण होत होत्या. त्या सर्व अडचणीवर पर्याय काढून शेतकऱ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज सादर करता यावा. याकरिता हा बदल करण्यात येत आहे. या नव्या सुधारण्यानुसार शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीत हे संकेस्थळ परत नव्याने सुरू केले जाणार आहे. maha dbt
कधी होइल mahadbt पोर्टल सुरु
एक एप्रिल 2025 पासून महाडीबीटी पोर्टल नवीन अर्ज करण्यासाठी बंद करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना नवीन अर्ज सादर करण्यासाठी हे पोर्टल 15 एप्रिल 2025 पासून परत सुरु केले जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. संकेतस्थळामधील काही महत्त्वाचे बदल आणि नेहमी उद्भवणाऱ्या अडचणी या सोडवण्याचे काम सध्या पोर्टलवर सुरू आहे. या सर्व अडचणी सोडवल्यानंतर पोर्टल साधारणपणे 15 एप्रिल 2025 पासून शेतकऱ्यांसाठी सुरळीतपणे सुरू केले जाईल. maha dbt
महाडीबीटी पोर्टलवर या योजना उपलब्ध.
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने महाडीबीटी (maha dbt) पोर्टल सुरू केली. या पोर्टलवर शासनाकडून शेती आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा लाभ वितरित केला जातो. महाडीबीटी च्या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ दिला जातो ते खालील प्रमाणे.
- कृषी यांत्रिकीकरण
- कृषी सिंचन
- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
- कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम योजना
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- राष्ट्रीय कृषी विकास योजना.
- राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
- मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजना.
यासारख्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून वितरित केला जातो. शेतकऱ्यांच्या घटकांचा लाभ हवा आहे त्या घटकासाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर केल्यानंतर शेतकऱ्यांना निवडलेल्या घटकासाठी अनुदान वितरित केले जाते. maha dbt