Maharashtra Government शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra Government : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज दिले जाणार आहे.आता राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळविण्यात येणार आहे.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या ते आता दूर होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने या संदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमीन धारक शेतकऱ्यांना त्या जमिनीवर तारण कर्ज मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.Maharashtra Government

Maharashtra Government

भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारणा कर्ज कोणत्या बँकेकडून दिले जाणार

राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकेकडून कर्ज हा निर्णय महसूल विभागाने घेतलेल्या मुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.भोगवटदार वर्ग 2 च्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज कोणतेही बँकेकडू मिळवणं सोपी होणार आहे. घेण्यात आलेला हा निर्णय फक्त एका बँके पुरतात मर्यादित नसून राज्यातील कोणतेही बँकेतून कर्ज घेता येणार आहे. या अगोदर 1990 मध्ये भोगवटदार वर्ग दोन च्या जमिनी बाबत परिपत्रक काढण्यात आले होते.

आता कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेसह जिल्हा मध्यवर्ती बँकांमधून हे कर्ज शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना या कर्जासाठी जिल्हा अधिकाऱ्याची किंवा शासनाची परवानगी घ्यावी लागणार नाही, त्यामुळे ही कर्ज प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी खूप सोपी आणि जलद होईल. Maharashtra Government

हे वाचा : जमीन, मालमत्तेवर हक्क मिळवायचा असेल तर, पहा सविस्तर .

महसूल विभागाच्या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज सहज मिळू शकणार

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत असते. मात्र, जर एखाद्या शेतकरी घेतलेले कर्ज परतफेड करू शकला नाही. तर बँक आर्थिक संकटात येते. अशावेळी बँकेने शेतकऱ्यांकडून तारणा घेतलेली जमीन ही भोगवटादार वर्ग 2 असेल तर त्या जमिनीवर बोजा चढवतात येत नाही बँकेचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग दोन च्या जमिनी तारणा ठेवल्या जात नव्हत्या.त्यामुळे भोगवटादार वर्ग दोन च्या शेतकऱ्यांना या अगोदर कर्ज मिळत नव्हते .आता जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारणा म्हणून घेता येणार आहे याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे . Maharashtra Government

भोगवटदार वर्ग दोन च्या जमिनी म्हणजे काय?

भोगवटदार वर्ग दोन च्या जमिनी म्हणजे काय,असा प्रश्न अनेक जणांच्या मनामध्ये असतो . या जमिनीच्या खातेदाराकडे असतात, ज्यांना शासनाचा परवानगीशिवाय विक्री करण्याचा कोणताही अधिकार नसतो .

  • यामध्ये देवस्थानासाठी दिल्या इनामी जमीन .
  • हैदराबाद अतीयत जमीन
  • वन जमीन
  • गायरान जमीन
  • वतन जमीन
  • पुनर्वसनाच्या जमिनी
  • आणि शासनाकडून देण्यात आलेल्या इतर काही जमिनींचा समावेश भोगवटदार वर्ग 2 मध्ये होतो

भोगवटा वर्ग 2 जमीनधारक शेतकऱ्याना मोठा दिलासा

महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील भोगवटादार वर्ग 2 जमीन धारण शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर  होणार आहेत. आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनीवर तारणकर्ज शेतकऱ्याना देता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देत असताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी हा निर्णय घेतलाय. हा निर्णय फक्त एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग 2 खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगावटादार वर्ग 2 च्या जमीनी बँकेला तारण घेता येणार आहे. Maharashtra Government

1 thought on “Maharashtra Government शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…”

Leave a comment

Close Visit Batmya360