Maharashtra pik vima शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानी पासून आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी व नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेला अतिशय प्रतिसाद दिल्यामुळे राज्य शासनाने पिक विमा योजनेत बदल करण्याचे ठरवले.
महाराष्ट्र राज्य शासनाने 2023 मध्ये राज्यांमध्ये सर्व समावेशक पिक विमा योजना लागू केली. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याबाबत राज्य शासनाने एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये एकमताने ही योजना बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सर्वसमावेशक एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे. येत्या खरीप हंगाम 2025 पासून राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयातील पिक विमा योजना बंद केली जाणार आहे.

का बंद करण्यात आली एक रुपयांमध्ये पीक विमा योजना
2023 मध्ये राज्य सरकारने सुरू केली सर्व समावेशक पिक विमा योजना राज्य शासनास का बंद करत आहे? हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचची असणारी पीक विमा योजना राज्य शासन का बंद करत आहे ? याचं कारण ही पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकारने 2023 मध्ये राज्यांमध्ये सर्वसामावेशक एक रुपयातील पिक विमा योजना सुरू केली. शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी फक्त एक रुपया रक्कम भरावी लागत होती.
एक रुपयात अर्ज करणे शक्य झाल्यामुळे या योजनेमध्ये अनेक गैरप्रकार समोर आले. अधिवेशनादरम्यान भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत सर्व खुलासा सभागृहात मांडला. कशा पद्धतीने या योजनेमध्ये गैरप्रकार केले जातात याची सविस्तर माहिती आणि पुरावे सभागृहामध्ये मांडले होते. सभागृहामध्ये मांडलेल्या माहिती मध्ये सुरेश धस यांनी पिक विमा योजनेमध्ये कसा गैरप्रकार झाला याचे सर्व पुरावे देखील सादर केले होते. सुरेश धस यांनी सादर केलेल्या पुराव्या च्या आधारे कृषि विभागाने तपसणी केली. या तपासणी दरम्यान अनेक प्रकरणे उघडकीस आली. या गैर प्रकाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून राज्य शासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
खरीप हंगाम 2023, रब्बी हंगाम 2023, तसेच खरीप हंगाम 2024 या हंगामामध्ये पिक विमा योजनेमध्ये अनेक गैरप्रकारे अर्ज सादर करण्यात आले. ज्यामध्ये शासकीय जमिनीवर पिक विमा अर्ज भरणे, गायरान ,देवस्थान जमिनी, पडीक जमिनी, डोंगराळ जमिनी अशा विविध जमिनीवर गैरप्रकार करून पिक विमा लाटण्याचा प्रयत्न या योजनेमध्ये काही नराधमाने केला. या अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याचे महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नविन नियम होणार लागू Maharashtra pik vima
राज्य शासनाने एक रुपयातील पिक विमा योजना जरी बंद केली असली तरी; यासाठी नवीन नियमावली जाहीर करून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे संरक्षण मिळवण्यासाठी पिक विमा काढता येणार आहे. यासाठी जुन्या नियमानुसार म्हणजेच शेतकऱ्यांना शेतकरी हिस्सा भरावा लागणार आहे. राज्य शासनाने याबाबत शेतकऱ्यांना आता हेक्टरी 1200 रुपये पर्यंत हप्ता भरावा लागेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत अजून शिक्कामोर्तब झालेले नाही परंतु बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली आहे. यावर राज्य शासन पूर्वीप्रमाणेच प्रत्येक पिकाला वेगवेगळी शेतकरी हिस्सा रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून देते किंवा बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रत्येक हेक्टर ला 1200 रुपये (कोणत्याही पिकासाठी) या प्रमाणात नियम लागू करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
योजना बंद नको त्रुटी दूर करा!
शेतकऱ्यांच्या मनात लोकप्रिय असणारी पिक विमा योजना. याबाबत राज्य शासनाने हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांचे हित जपणारा नाही. याउलट राज्य शासनाने योजना बंद न करता या योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा. पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी. योजना पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी तसेच शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई देण्याबाबतच्या पद्धतीमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक मिळावा अशी तरतूद करावी. या प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून सादर केल्या जात आहेत.