Maharashtra School news राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि मराठी माध्यमात मोठा बदल होणार….! कोणता बदल होणार?

Maharashtra School news : सध्या राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत आहे. सध्याच्या काळामध्ये पालकांचा कल हा सीबीएसई तसेच अर्ध इंग्रजी माध्यमाकडे वाढत चालला आहे यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धती बाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत . याच धर्तीवर आता राज्यामध्ये शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे .या नवीन बदलामुळे विद्यार्थ्यावरचा अभ्यासक्रमाचा ताण कमी होणार असून,पाठांतराच्या सवयीला बसणार आहे. राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून नव्या प्रश्नपत्रिका प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे . Maharashtra School news

Maharashtra School news

कसे असतील प्रश्नपत्रिकांचे नवे स्वरूप

राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा व मूल्यमापन पद्धतीत अमूलग्र बदल करण्यात येणार आहे .हा बदल असा केला जाणार आहे की,प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका मध्ये इतर विषयाशी संबंधीत प्रश्न असतील . उदा. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इतिहासाशी संबंधित गणिते तर, इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत भूगोलातील संकल्पना वर आधारित आकलन प्रश्नांचा समावेश असेल .या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धीचा व विचार क्षमतेचा वापर करून प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील . घोकलपट्टी करण्यापेक्षा विचार क्षमतेने आणि सृजनशीलता यावर भर दिला जाणार आहे .Maharashtra School news

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : फेलोशिप साठी असा करा अर्ज…

उत्तर पत्रिका तपासणी पारदर्शकता

आता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा शाळा स्तरावर होणार असून त्यांच्या उत्तर पत्रिका ह्या इतर शाळेतील शिक्षक तपासणार आहेत . त्यामुळे मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे .Maharashtra School news

प्रशिक्षित विषय तज्ञांकडून पेपर सेटिंग

यशदा या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विषयतज्ज्ञ शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले आहे .या शिक्षकांकडे नवीन प्रश्नपत्रिका तयार करण्याची जबाबदारी असणार आहे .यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची समज आणि विशेष क्षमता,उपयोजना,कौशल्याचा समावेश करण्यात येणार आहे.

याबद्दला मागची उद्दिष्ट

राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार स्पष्ट केले आहे की,विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि अभ्यासावरील ताण कमी करणे, पाठांतरापेक्षा विचार क्षमतेला प्राधान्य देणे हा नव्या धोरणामागील मेन उद्देश आहे या शैक्षणिक धोरणामुळे राज्यातील शैक्षणिक व्यवस्थापन आणि सशक्त होणार आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगणी विकास साधण्याचा प्रयत्न या नवीन बदला मधून केला जाणार आहे ज्यामुळे भविष्यातील स्पर्धात्मक कलयुगात त्यांना ठामपणे उभे राहता येईल ,असा विश्वास शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे .Maharashtra School news

दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेपेक्षा दहा दिवस आधीच

यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित कालावधी पेक्षा 10 दिवस आधीच पार पडले आहेत .बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका याचे मूल्यमापन पूर्ण झाले असून,लवकरच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.15 मे पूर्वी बारावीचा निकाल घोषित केला जाईल अशी शक्यता आहे तर,त्यानंतर 20 ते 22 मे दरम्यान दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे .अशी माहिती देण्यात आली आहे.Maharashtra School news

Leave a comment