Maharashtra Weather Update: राज्यातील या जिल्ह्यांना विजांच्या कडकटासह पुढील 3 दिवस पावसाचा अलर्ट…

Maharashtra Weather Update : राज्यामध्ये मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे . आज 13 मे रोजी मुंबई,पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे.मुंबई शहरांमध्ये आज आणि उद्या म्हणजे 14 मे रोजी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे .ठाणे आणि मुंबई मध्ये ढगांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे तसेच,दक्षिण कोकणामध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा ,सांगली ,सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे .Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update

आज मान्सून अंदमानमध्ये पोहोचण्याचा अंदाज

नैऋत्य मोसमी पाऊस आज 13 मे रोजी अंदमान- निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे .अंदमान निकोबार या भागामध्ये जोरदार पावसाची सुरुवात झाली पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे .तसेच,आता मान्सून पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरसह अरबी समुद्रातही दाखल होईल,असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

24 तासांमध्ये निकोबार बेटावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचे नोंद झाली आहे. यामुळे त्या ठिकाणी 24 तासांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज काल 11 मे रोजी भारतीय हवामान विभाग दिला .दरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये काल (12 मे रोजी) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे .तसेच,आज आणि उद्या (13 आणि 14 मे रोजी) राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता आहे .Maharashtra Weather Update

हे वाचा : पोटहिश्याचा नकाशा आहे का? तरच जमीन खरेदी,राज्य शासनाचा नवा नियम, वाचा सविस्तर.

येत्या दोन दिवसात या जिल्ह्यांना पावसाचा ॲलर्ट

राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये कोकण- गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग असा हवामान विभागाचा अंदाज आहे .पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील तुरळ ठिकाणी ढगांच्या कडकडाटसह, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपात चा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे .कोकण आणि गोव्यात 13 मे आणि 14 मे रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे .पुणे आणि घाट विभाग ,कोल्हापूर आणि घाट विभाग, सातारा, सांगली, बीड ,धाराशिव या ठिकाणी ढगांच्या कडकडाटसह हलक्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे .त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे .Maharashtra Weather Update

पुण्यात 4 दिवस ‘येलो’ अलर्ट

पुणे शहरात मागील दोन दिवस झाले पाऊस सुरू आहे यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे .पुढील चार दिवसात तापमान मध्ये थोडीशी घट होणार असून,विजांच्या कडकडात ,वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे यामुळे पुणे शहरात पुढील चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .Maharashtra Weather Update

विदर्भातील या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज ॲलर्ट

14 आणि 15 मे रोजी विदर्भातील गोंदिया भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांना ऑरेंज ॲलर्ट जारी करण्यात आला आहे .असा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे .यामुळे या जिल्ह्यासह विदर्भात येणारे दोन ते तीन दिवस जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे .

नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर मध्ये अवकाळी पाऊस

नाशिक शहरासह त्रिंबकेश्वरला आज बारा मे रोजी जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे .काल दिवसभरामध्ये नाशिक शहरामध्ये 21 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे .जोरदार पाऊस झाल्यामुळे शहराच्या रस्त्यावरून पाणी वाहत होते, यानंतर सायंकाळी त्र्यंबकेश्वरच्या नाल्या रस्ते यांना नदीचे रूप प्राप्त झाले होते .दरवर्षी असे फक्त पावसाळ्यामध्येच पाहायला मिळत होते .पण मात्र यावर्षी मी मध्येच अशी स्थिती पाहायला मिळाली .नाशिक शहराबरोबरच त्र्यंबकेश्वर मधील मान्सून पूर्व नालीसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे,त्र्यंबकेश्वर मध्ये रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहने देखील अडकून पडली होती,पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यात सुरुवात झाली. Maharashtra Weather Update

Leave a comment