Mazi Kanya Bhagyashree Yojana सरकारची मुलींसाठी खास योजना! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50,000 रुपये; पहा सविस्तर माहिती.

Mazi Kanya Bhagyashree Yojana : केंद्र सरकारने मुलीच्या भविष्यासाठी अनेक योजना राबवले आहेत तसेच केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारनेही मुलीच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवलेले आहे. तसेच आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी राबवण्यात आलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
राज्य सरकारच्या माजी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे दिले जातात. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 50,000 रुपये दिले जातात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mazi Kanya Bhagyashree Yojana

Mazi Kanya Bhagyashree Yojana उद्देश

माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यामागचा उद्देश म्हणजे मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे त्यांच्या शिक्षणामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता भासू नये या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत या योजनेअंतर्गत पैसे दिले जातात. तसेच ज्या कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला हवी.

हे वाचा : तलाठी कार्यालयातील विविध सुविधा आता ऑनलाइन.

Mazi Kanya Bhagyashree Yojana वैशिष्ट्ये

  • या योजनेत मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने जॉईंट खाते उघडले जाते.
  • माझी कन्या भाग्यश्री योजनेत 1 लाखांचा अपघात विमा दिल जातो .
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा: पाच हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते.

Mazi Kanya Bhagyashree Yojana लाभार्थी पात्रता

  • एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करू शकतात.
  • मुलीच्या आई-वडिलांनी कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ केवळ पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांनाच मिळतो.

Mazi Kanya Bhagyashree Yojana आर्थिक लाभ

या योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करू शकतात. माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांना कुटुंब नियोजन शास्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन मुलीच्या नावावर 25000 – 25000 रुपये दिले जातात.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना लाभ दिला जातो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये एवढा लाभ दिला जातो. त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये आणि ज्यावेळेस मुलगी सातवीत जाते त्यावेळेस 7 हजार रुपये आणि मुलगी अकरावी गेल्यानंतर 8000 रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 75000 रुपये दिले जातात याचा अर्थ असा की मुलगी जन्माला पासून ते 18 वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावावर 1 लाख 1 हजार रुपये जमा होतात.

Mazi Kanya Bhagyashree Yojana अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभा दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल. आणि तो फॉर्म तुम्हाला महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे जमा करावा लागेल.

निष्कर्ष

माझी कन्या भाग्यश्री योजना ही गरीब कुटुंबांतील मुलींच्या शिक्षण व भविष्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या योजनेतून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठा आर्थिक पाठिंबा मिळतो. या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा.Mazi Kanya Bhagyashree Yojana

1 thought on “Mazi Kanya Bhagyashree Yojana सरकारची मुलींसाठी खास योजना! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50,000 रुपये; पहा सविस्तर माहिती.”

Leave a comment

Close Visit Batmya360