Rabi Pik Spardha Nikal : राज्यातील पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवले जाते. यामुळे ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेऊ शकतात. त्यांचे यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते व राज्याच्या कृषी उत्पादनात मोलाची भर पडते या उद्देशाने राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

Rabi Pik Spardha Nikal स्पर्धेची वैशिष्ट्ये
- रब्बी हंगामात (Rabi Pik Spardha Nikal )2023 साठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांसाठी स्पर्धा घेण्यात आली.
- स्पर्धेसाठी तालुका हा प्राथमिक घटक मानला गेला.
- स्पर्धक शेतकऱ्यांच्या उत्पादनाची तुलना पाच वर्षांच्या सरासरी उत्पादकतेशी केली गेली.
हे वाचा : सरकारची मुलींसाठी खास योजना! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 50,000 रुपये; पहा सविस्तर माहिती.
Rabi Pik Spardha Nikal प्रक्रिया
- राज्यस्तरीय (Rabi Pik Spardha Nikal) निकाल मा. आयुक्त (कृषी) यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आला.
- ज्या शेतकऱ्यांनी तालुक्याच्या सरासरी उत्पादनाच्या दीडपट किंवा अधिक उत्पादकता गाठली, त्यांना पुरस्कारासाठी पात्र मानले गेले.
- राज्यस्तरीय निकाल जाहीर झाल्यानंतर, जिल्हास्तरीय समितीने सर्वसाधारण व आदिवासी गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेते निवडून निकाल घोषित केला.
पिक स्पर्धा रब्बी हंगाम 2023 राज्यस्तरीय विजेते शेतकरी
ज्वारी (सर्वसाधारण गट)
कोल्हापूर – श्री. चंद्रसेन नारायण पाटील – तिसंगी,कवठे महाकाळ
कोल्हापूर – श्री. विशाल वसंत पवार- कोठे महाकाळ
लातूर – श्री. रत्नकार गंगाधर ढगे- सायाळ,लोहा,नांदेड
ज्वारी (आदिवासी गट)
नाशिक – श्री लक्ष्मण सजन पाडवी – बंधारा,ताळेदा ,नंदुरबार
नाशिक – श्री.शिवाजी मिचरा गावित – कुक रान ,नवापूर,नंदुरबार
नाशिक- श्री.विक्रम बळवंत मावची – खेकडा,नवापूर,नंदुरबार
गहू (सर्वसाधारण गट)
नाशिक- श्री.गोरखनाथ पोपटराव राजोळे – एकलहरे,नाशिक
नाशिक- श्रीमती लिलाबाई मधुकर पेखळे – माडसावंगी,नाशिक
नाशिक- श्री.रामदास विठोबा करंजकर – भगूर ,नाशिक
गहू (आदिवासी गट)
नाशिक – श्री. त्र्यंबक सुका बेंडकोळी – धोंडेगाव, नाशिक
पुणे – श्रीमती यमुनाबाई विठ्ठल मोहरे – अवसरी बु,आंबेगाव,पुणे
अमरावती- श्री . कल्लू नंद भुसुम – कारदा,चिखलदरा,अमरावती
हरभरा (सर्वसाधारण गट)
कोल्हापूर- श्री. नवनाथ दत्तू खोत – लेणार वाडी,कवठेमहाकाळ,सांगली
नाशिक – श्री . ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील – कुसुंबा,चोपडा,जळगाव
अमरावती – श्री .प्रशांत जनाराव श्री सागर- खार तळेगाव,भातुकली,अमरावती
हरभरा (आदिवासी गट)
नागपूर – श्री. अरुण कवडुजी केदार – शेगाव खुर्द,भद्रावती,चंद्रपूर.
नागपूर – श्री . सुदरशाह सोनू जुमनाके – चक खापरी , पोंभुर्णा ,चंद्रपूर
नाशिक – श्री . रणजीत श्रीराम पवार- खैर खुटी, शिरापूर ,धुळे
करडई (सर्वसाधारण गट)
लातूर- श्री . माधव शंकरराव पाटील- चैनपूर , देगलुर,नांदेड
लातूर- श्री. विश्वनाथ भाऊराव मांडजे- येरोळ,शिरूर अनंतपाळ,लातूर
जवस (सर्वसाधारण गट)
नागपूर- श्री. लिलीराम उद्धव पिदुरकर – चक खापरी, पोंभुर्णा,चंद्रपूर
नागपूर – श्री. तुळशीराम भिवाजी मोरे -चक खापरी,पोंभुर्णा,चंद्रपूर
नागपूर- श्री. यशवंत विश्वनाथ काळे- -चक खापरी,पोंभुर्णा,चंद्रपूर
जवस (आदिवासी गट)
नागपूर – श्री. हरिचंद्र अनंतराव कोडापे – चक खापरी ,पोंभुर्णा,चंद्रपूर
नागपूर – श्री. तुळशीराम गोसाई जुमनाके -चक खापरी,पोंभुर्णा,चंद्रपूर
नागपूर – श्रीमती सुनबाई अनंतराव कोडापे -चक खापरी,पोंभुर्णा,चंद्रपूर