Milk Rate : गाय दूध खरेदी दरात वाढ झाली आहे. ही वाढ येथे 26 फेब्रुवारीपासून करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे दूध उत्पाद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाईच्या दूध दरात (Milk Rate) येत्या २६ तारखेपासून एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सोनाई सह राज्यातील काही दूध संघांनी घेतलेला आहे. तर आता शेतकऱ्यांना प्रति लिटर 33 रुपये राज्यातील दूध संस्थांनी घेतला आहे.

वारंवार वाढलेले दूध खरेदी दर
डिसेंबर महिन्यापासून आतापर्यंत दूध खरेदी (Milk Rate) दरात पाच वेळा वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यातही ही दुसरी वाढ असणार आहे. जागतिक बाजारात बटर आणि दूध पावडरच्या किमती कमी झाल्यामुळे मागील काही काळात दूध खरेदी दरात मोठी घट झाली होती. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर मग राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनुदान बंद झाले. मग त्यानंतर दूध खरेदी दरात दरात हळूहळू वाढ करण्यास सुरुवात झाली. ज्यावेळेस इंदापूरच्या सोनाई दूध संघाने 1- 1 रुपयाची वाढ केल्यानंतर राज्यातील इतर दूध संघांनीही दूध खरेदी दरात (Milk Rate) हळूहळू वाढ करायला सुरुवात केली होती .
हे वाचा : किती वाजता जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता.
सध्याचे दर आणि पुढील अंदाज
नोव्हेंबर महिन्यात गाय दूध खरेदी दर प्रति लिटर 28 रुपये होता. 11 फेब्रुवारीपासून हा दर 32 रुपये झाला. 26 फेब्रुवारीपासून तो 33 रुपये होणार असून, वाहतूक खर्चासह एकूण दर 35 रुपये दर पत्रक काडण्यात आले आहेत .
उन्हाळ्यात दर घसरतील का?
मागील वर्षी उन्हाळ्यात दूध खरेदी दर अचानक कमी करण्यात आला होता, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्या वेळी दूध संघांनी सरकारकडे बोट दाखवत अनुदान मागितले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने अनुदान दिले होते. मात्र, यंदा उन्हाळ्यात दूध खरेदी दर चार महिने तरी स्थिर राहील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Milk Rate)