MILK SUBSIDY : दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपये जमा, आणखी ११ कोटी अनुदान मंजूर.

MILK SUBSIDY शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अनुदान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४९ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे . जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत खासगी आणि सहकारी दूध संघांकडून संकलित दुधासाठी प्रतिलिटर ५ ते ७ रुपये अनुदान मंजूर झाले आहे . या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९०  रुपये जमा करण्यात आले आहेत, तसेच आणखी ११ कोटी रुपये मंजूर असून, १२ कोटी ९६ लाख ८३ हजार रुपये अनुदानासाठी प्रस्ताव दाखल आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे .

हे वाचा: पीएम सूर्य घर योजना साठी नवीन अर्ज सुरू

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MILK SUBSIDY चार महिन्यांत ३९ कोटींचे अनुदान

जिल्हा दुग्धविकास अधिकारी नामदेव दवडते यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत उत्पादित ७ कोटी ८५ लाख लिटर दुधासाठी ३९ कोटी २८ लाख रुपयांचे अनुदान वितरित होणार आहे . याआधी आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध पावडरच्या घसरलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जानेवारी ते मार्च या कालावधीत ही योजना सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही योजना पुन्हा जुलै ते ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली .

MILK SUBSIDY अनुदानाचे दर आणि वितरण

  • जुलै ते सप्टेंबर: गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान.
  • ऑक्टोबर: प्रतिलिटर ७ रुपये अनुदान.

MILK SUBSIDY नोव्हेंबर महिन्यापासून ही योजना थांबवण्यात आली असून, ती पुन्हा सुरू करण्याबाबत शासन विचार करत आहे.  योजनेअंतर्गत चितळे डेअरीला सर्वाधिक २ कोटी ७७ लाख रुपये, तर राजारामबापू दूध संघाला २ कोटी ६४ लाख रुपये अनुदान मिळाले. याशिवाय फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, अग्रणी मिल्क, संपतराव देशमुख दूध संघ, आणि शिवनेरी मिल्कलाही मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन फायद्यासाठी उपाययोजना आवश्यक

MILK SUBSIDY शासनाच्या अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पन मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे दूध उत्पादकांना दीर्घकालीन उपायांची गरज आहे. हमीभाव धोरण, उत्पादन खर्चावर आधारित अनुदान, तसेच स्थिर बाजारपेठ निर्मिती हे उपक्रम प्रभावीपणे राबवले गेले, तर शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल आणि त्यांच्या प्रगतीला चालना मिळेल .

Leave a comment

Close Visit Batmya360