Mofat pithachi Girani Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळते ज्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे .
मोफत पिठाची गिरणी ही योजना 2024 मध्ये सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो .राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे ज्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास खूप मोठी मदत होणार आहे. ज्यामुळे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना कमी भांडवल गुंतवावे लागणार आहे. Mofat pithachi Girani Yojana

पिठाची गिरणी हा व्यवसाय कमी खर्चामध्ये चांगला नफा देणारा ठरतो. तसेच, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग पीठ हे स्वयंपाक करण्यासाठी रोजच लागते त्यामुळे हा व्यवसाय वर्षभर चालू राहतो.
महिलांना मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 90 टक्के अनुदान शासन देत आहे. म्हणजेच आता महिलांना फक्त पिठाच्या गिरणी साठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे हा व्यवसाय महिलांना अगदी कमी खर्चामध्ये सुरू करता येतो. विशेषता: ही योजना आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. Mofat pithachi Girani Yojana
हे वाचा : मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा मिळवा लाभ.
मोफत पिठाची गिरणी योजनेची उद्दिष्टे
- महिलांसाठी एक चांगली रोजगाराची संधी निर्माण करणे.
- महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वलंबी बनवून त्यांचे सशक्ति करण करणे.
- ग्रामीण भागामध्ये लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे व स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे.
- या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन कुटुंबाचे एकूण उत्पन्न वाढेल. Mofat pithachi Girani Yojana
या योजनेचे पात्रता आणि निकष काय?
- अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असते आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- महिला अनुसूचित जाती किंवा जमाती मधील असावी.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख लाख रुपयापेक्षा कमी असले पाहिजे.
- या योजनेसाठी विशेषता ग्रामीण भागातील महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या महिलांच्या नावाने बँक खाते असणे आवश्यक आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
- अर्ज करणाऱ्या महिलांचे आधार कार्ड.
- अनुसूचित जाती किंवा जमातीचे प्रमाणपत्र असले पाहिजे.
- कुटुंबाचे रेशन कार्ड.
- महिलांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र.
- बँक खात्याचा तपशील पासबुक आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांचा पासपोर्ट साईज फोटो.
- दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र (असल्यास):BPL कार्डाची प्रत .
- कोटेशन: पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी शासन मान्य विक्रेत्याची कोटेशन.
अर्ज कसा करायचा?
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना सर्वप्रथम स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावा लागेल.
- अर्जामध्ये सर्व व्यवस्थित विचारलेली माहिती भरून अर्ज पूर्ण करून घ्यावा.
- वरील नमूद केलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी
- त्यानंतर संपूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयात सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि पात्रता तपासली जाईल
- तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर, संबंधित महिलेला अनुदान मंजूर केले जाईल.
- मंजूर झालेले अनुदान हे थेट अर्ज करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. Mofat pithachi Girani Yojana
या योजनेचे फायदे
- या योजनेचा फायदा हा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे कारण की ग्रामीण भागातील महिलांना पिठाच्या गिरणीची वर्षभर गरज असते, त्यामुळे महिलांना नियमित उत्पन्न मिळू शकणार आहे.
- विशेष म्हणजे पिठाची गिरणी ही चालवण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची गरज नाही
- महिलांना पिठाची गिरणी हा व्यवसाय करण्यासाठी सरकार अनुदान देत असल्यामुळे अत्यंत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. Mofat pithachi Girani Yojana
यांना मिळाला लाभ
हिंगोली येथील जिल्हा परिषद च्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने 2024-25 या वर्षात जि.प.सेस वविशेष घटक योजनेतून 106 लाभार्थ्यांना पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले आहे .पिठाची गिरणी वाटपामुळे लाभार्थी आत्मनिर्भर बनले आहेत Mofat pithachi Girani Yojana