Maharashtra Weather Update : राज्यामध्ये अवकाळी पावसाचे दिसत आहेत. मागील दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडात सह जोरदार पावसाने हजेरी लावली. मागील 24 तासांमध्ये देशातील हवामानात खूप मोठा बदल झाला आहे. काही काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडले आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णता पण कमी झाली आहे. मुंबई, कोकण पट्ट्यात अवकाळी पावसाच्या हजेरीने बहुतांश नागरिकांची धावपळ निघाली. मागच्या आठवड्यामध्ये तीव्र तापमानाचे चटके जाणवत असल्याने आता थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा हाय अलर्ट कायम राहणार असून राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोकणपट्ट्यात सध्या मध्यम तीव्रतेचे ढग दिसून आले आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात आजही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासांमध्ये पाऊस झाल्याने तापमानामध्ये जवळजवळ 6 -7 अंशाची घट झाली आहे.दरम्यान,हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामुळे लहान आरोग्याच्या समसेकडे वेळेस लक्ष देण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे .Maharashtra Weather Update
हवामान विभागाचा इशारा काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार,सध्या चक्रकार वारी यांची स्थिती ईशान्य अरबी समुद्रावर कायम आहे.आणि मध्य प्रदेश पासून ते दक्षिण कोकण पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सगळीकडेच पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे .उद्या पासून पावसाचा जोर मध्यम महाराष्ट्र कोकणातून थोडासा कमी होणार आहे आणि विदर्भ पुढील तीन दिवस पुन्हा पावसाचेच वातावरण राहणार आहे . मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देण्यात आली आहे Maharashtra Weather Update
कोठे कोणता अलर्ट?
8 मे रोजी म्हणजेच आज राज्यामध्ये IMD ने दिलेल्या माहितीनुसार पावसाचा इशारा कायम आहे .मध्य महाराष्ट्र ,कोकण मराठवाडा ,आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- 8 मे रोजी – रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला,गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. राहिलेल्या जिल्ह्यांना अलर्ट नसला तरी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- 9 मे रोजी – अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार – येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. - 10 मे रोजी – संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट , नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे .
- 11 मे रोजी – नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली – येलो अलर्ट देण्यात आला आहे . Maharashtra Weather Update