MTSKPY application start. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे हेतूने राज्यामध्ये मागेल त्याला कृषी सौर पंप योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प दरात कृषी सौर पंप वाटप केला जातो. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. मधल्या काळात सर्व्हर च्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना नवीन अर्ज करण्यासाठी समस्या उद्भवत होत्या. परंतु आता संकेत स्थळ अद्यावत करून शेतकऱ्यांसाठी सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांना कृषी सौर पंप ची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला कृषी सौर पंप या घटकासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज केल्यानंतर या शेतकऱ्यांना शासनाकडून सौर कृषी पंप वाटप केले जाणार आहेत.
MTSKPY application start कोण करू शकतो अर्ज.
राज्यातील प्रत्येक शेतकरी ज्याच्या नावे शेतजमीन आहे. असा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु अर्ज करणार शेतकऱ्यांनी याआधी कुसुम सौर ऊर्जा, मुख्यमंत्री सौर पंप ऊर्जा किंवा महाऊर्जाच्या मार्फत कसल्याही प्रकारचा शेतीपंपासाठी लाभ घेतलेला नसावा. तरच या शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येईल व सौर कृषी पंपाचा लाभ मिळेल. जर शेतकऱ्याने या आधी या घटकाचा लाभ घेतला असेल तर त्याला परत या योजनेतून लाभ दिला जात नाही.
अर्ज कोठे सादर करावा
शासनाने मागेल त्याला कृषी सौर पंप साठी एक संकेतस्थळ निर्माण केले आहे. https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या संकेतस्थळावर शेतकऱ्यांना स्वतः अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी शेतकरी स्वतः किंवा आपल्या जवळील सीएससी केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र यांच्या माध्यमातून देखील आपला सौर कृषी पंपासाठी चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतात.
हे वाचा: मागेल त्याला सौर पंप अर्ज असा करा
अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.
मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा (जलस्तोत्राची नोंद असणे आवश्यक), आठ अ,. आधार कार्ड,शेतकऱ्याचा फोटो, बँक पासबुक, सामायिक क्षेत्र असेल तर सहमती पत्र ,सामायिक विहीर बोर असेल तर त्याचे सहमती पत्र एवढी कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक लागतात.
नवीन अर्ज का झाले होते बंद
मागेल त्याला कृषी सौर पंप या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आले होते. परंतु या पोर्टलवर अचानक मोठ्या प्रमाणावर लोड आल्यामुळे हे पोर्टल सुरळीत चालत नव्हतं. म्हणून मधल्या काळात पोर्टलच्या दुरुस्ती कामासाठी वेळ घेतला होता. आणि नवीन अर्ज पूर्णतः बंद केले होते. परंतु आता हे पोर्टल दुरुस्त झाले आहे व नवीन अर्ज स्वीकारण्यास सुरू झालेले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपला. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.