namo shetkari yojana 6th installment: केंद्र शासनाने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मदत केली जाते. योजने अंतर्गत देशातील 9 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आले. मागच्या वेळी पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता देखील वितरित करण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19 हप्ता मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता मिळणार का? आणि कधी मिळणार असा प्रश्न पडलेला आहे. आज आपण शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
पी एम किसान योजनेच्या 19 व्या हप्ता बरोबरच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची देखील प्रतीक्षा लागलेली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असल्याची देखील माहिती मिळालेली आहे. परंतु ही मिळालेली माहिती पूर्णतः चुकीची असून पीएम किसान योजनेच्या हप्त्या बरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार नाही. मग नमो शेतकरी योजना चा 6 वा (namo shetkari yojana 6th installment) हप्ता कधी वितरित होणार?

नमो शेतकरी योजनेचा 6 वा हप्ता कधी namo shetkari yojana 6th installment
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली. या योजनेचे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो.
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ पूर्णतः राज्य शासनाच्या अधिकारात येतो. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे अधिकार देखील राज्य शासनाला आहेत. राज्य शासनाकडून निधी मंजूर केल्यानंतर राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.
नमो शेतकरी योजनेचा लाभ वितरणाची प्रक्रिया
राज्य सरकार पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करेल अशी प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. परंतु हा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाला निधी मंजूर करणे आवश्यक आहे, राज्य शासनाने अद्याप पर्यंत कोणत्याही शासन निर्णयाद्वारे नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर केला नाही. त्यामुळे राज्य शासन हा हप्ता कधी वितरित करेल यावर अजूनही शंकाच निर्माण होत आहे. ज्यावेळी राज्य शासनाकडून 6 वा हप्ता वितरणासाठी निधी मंजूर केला जाईल त्यानंतर कृषी विभागाकडून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाईल. namo shetkari yojana 6th installment
नमो शेतकरी हप्ता लांबणीवरच
पी एम किसान सन्मान योजना सोबतच मिळालेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा होती. परंतु राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी राज्यांमध्ये योजनांचा आणि घोषणांचा पाऊस पाडला. ज्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली आहे त्यामुळे राज्य शासनाला सर्वच योजनेचा निधी वितरित करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. ज्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरण करण्यासाठी राज्य शासनाला विलंब होणार यात शंकाच नाही. परंतु राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करणे आवश्यकच आहे. लवकरच राज्य शासनाकडून निधी मंजुरी करून राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील हप्ता वितरित केला जाईल. namo shetkari yojana 6th installment
2 thoughts on “namo shetkari yojana 6th installment : पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी ?”