niradhar yojana :निराधार योजनेतील लाभार्थ्यांना आनंदाची बातमी! मार्च आणि एप्रिल महिन्याचा थकीत लाभ बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात…

niradhar yojana : आता निराधार लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .थांबलेल्या अनुदानाची प्रतीक्षा संपली ,पत्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत 3 हजार रुपये . मागील दोन महिन्यापासून या अनुदानाची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासा बातमी समोर आली आहे .राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षतेखाली निराधार अनुदान योजनेत मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकित अनुदानपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्यात येत आहे .niradhar yojana

niradhar yojana

दोन महिन्यांचे एकत्रित मिळणार 3 हजार रुपये

योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत मानधन म्हणजेच तीन हजार रुपये दिले जात आहे .मार्च महिन्याची 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये,असे मिळून 3000 रुपये लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे .योजनेअंतर्गत दिले जाणारे मानधन हे केंद्र शासनाच्या डीबीटी प्रणाली द्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे .niradhar yojana

हे वाचा : लाडक्या बहिणींना मिळणार 40 हजार रुपये कर्ज : हप्ता भरला जाणार योजनेतून – अजित पवार.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

योजनेच्या लाभार्थ्यांना आधार लिंक आणि केवायसी अनिवार्य

या योजनेअंतर्गत येणारे मानधन तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे .

  • तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे .
  • KYC प्रक्रिया पूर्ण असावी.

सरकारने डिसेंबर 2023 पासून आधार लिंक करणे बद्दल कार्य केले आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान हे केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे जमा होऊ शकले नाही. यामुळेच ज्या नागरिकांचे खाते अजूनही आधारशी लिंक केलेले नाही किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, नागरिकांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

मागील महिन्याचेही अनुदान वाटपात अडथळे

यापूर्वी सामाजिक न्याय विभागाने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे पाच महिन्याचे अनुदान मंजूर केले होते. मार्च महिन्यामध्ये निधी वितरित करण्यात आला मात्र, काही खात्यांची केवायसी अपूर्ण असल्यामुळे अनुदान रखडले होते. एप्रिल महिन्याचा निधी पण मंजूर असून, आता तू पण एकत्रितपणे वितरित करण्यात येणार आहे.

तुमचे खाते सक्रिय ठेवा; पैसे काढण्यासाठी केवायसी आवश्यक

अनेक लाभार्थ्यांची बँक खाते आधारशी संलग्र असले तरी पण ते खाते काही कारणामुळे बंद (inactive) झाले असू शकतात. अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन जमा झाली असली तरी पण तिला वर त्यांना रक्कम काढता येणार नाही. या कारणामुळे KYC अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया पूर्ण करून तुमचे खात पुन्हा सक्रिय करणे आवश्यक आहे.niradhar yojana

निष्कर्ष

राज्यातील हजारो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी ठरली आहे. सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान नियमितपणे देण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे, परंतु लाभार्थ्यांनाही काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे जसे की, आधार लिंक खाते व KYC प्रक्रिया वेळेवर पूर्ण ठेवणे आवश्यक आहे. यामुळे योजनेअंतर्गत मिळणारा लाभ तुम्हाला वेळेवर आणि कुठल्याही अडचणी शिवाय मिळत राहील.niradhar yojana

Leave a comment