nithin kamath: नितीन कामत यांचा श्रीमंत बनण्यासाठी महत्त्वाचा सल्ला…

nithin kamath : भुतालावरील प्रत्येक नागरिकाला आपण श्रीमंत असावं असं वाटतं. आपल्याला श्रीमंत होण्यासाठी काहीतरी सीक्रेट मिळावं आणि आपण हे सिक्रेटच्या माध्यमातून खूप श्रीमंत व्हावं असे अनेक जणांच्या मनात विचार असतात. परंतु श्रीमंत होणं होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मार्ग उपलब्ध नसतोच. याबाबतची माहिती प्रसिद्ध असणारे झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी दिली आहे.

nithin kamath

नितीन कामत (nithin kamath)

नितीन कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट उपलब्ध नाही. श्रीमंत होण्यासाठी नागरिकांना शिस्त आणि संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीमंत होण्यासाठी नागरिकांनी वायफट खर्च कमी करावा. गुंतवणुकीला सुरुवात करावी, आपत्कालीन आणि आरोग्य निधी तयार करण्याची खात्री करा. केवळ येणारी पगार खर्चासाठी नसून त्या पगारातून गुंतवणूक आणि बचत करण्याचा प्रयत्न करा. अशी माहिती झिरोधा कंपनीचे संस्थापक नितीन कामत यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी मिडल क्लास ट्रॅप लोकांना असा गुंतवतो ज्यामधून त्यांना बाहेर पडणं खूप अवघड होतं असंही ते म्हणाले.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नितीन कामत (nithin kamath) त्यांच्या माध्यमातून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मला अनेकदा लोक स्टॉक स्टीप्स किंवा त्यांना श्रीमंत बनवतील अशी कोणत्याही गोष्टी विचारतात. परंतु यामागील खरं कारण हे आहे की श्रीमंत होण्यासाठी कोणताही शॉर्टकट मार्ग उपलब्ध नसतो. त्यासाठी चांगल्या सवयी संयम बाळगण्याची आवश्यकता असते. नागरिकांनी गरज नसणाऱ्या वस्तू खरेदी करू नयेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांनी कर्ज घेऊन वस्तू खरेदी करू नयेत. मिळालं nithin kamath

हे वाचा : कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

मिडल क्लास ट्रॅप मधून कसे बाहेर पडावे

  • अनावश्यक खर्च टाळा व गुंतवणूक करण्यास सुरुवात करा. प्रत्येक महिन्याला किती खर्च होतो हे लिहून विनाकारण होणारा खर्च कमी करा, आपल्या मिळकतीमधील फक्त एक टक्के रक्कम इंडेक्स फंड सारख्या साधनात गुंतवा.
  • आपत्कालीन परिस्थितीसाठी निधी तयार करा. आपल्या उत्पन्नातील कमीत कमी सहा महिन्याचे पैसे शिल्लक ठेवा. उदाहरणार्थ जर तुम्हाला पंचवीस हजार रुपये पगार असेल तर दीड लाख रुपये जमा करा जेणेकरून तुमची नोकरी जरी गेली तरी तुम्ही आरामात जगू शकता.
  • हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये कधी कोणावर कोणती परिस्थिती येईल सांगता येत नाही. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स नक्की घ्या जेणेकरून तुमच्या आरोग्य संबंधी येणारा खर्च इन्शुरन्सच्या माध्यमातून पूर्ण होईल.
  • कोणत्याही भूलथापाला आणि लोकांना बळी पडू नका. झटपट परताव्याच्या शोधात पैसे वाया घालू नका. नियमित गुंतवणुकीची सवय लावा.nithin kamath

Leave a comment